'गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे सर्व पर्याय खुले'

goa congress.jpg
goa congress.jpg
Published on: 
Updated on: 

पणजी : गोव्यातील (Goa) भाजप सरकारचा (BJP government) विधानसभेच्या येत्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने सर्व पर्याय खुले ठेवले असल्याची माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी येथे दिली.

पणजीत काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेसने भाजपला पराभूत करण्याचा निश्चय केलेला आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष मजबूत असल्यामुळेच काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी इतर अनेक पक्ष इच्छुक आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते काँग्रेस पक्ष घेईल मात्र ते निर्णय काय असतील ते मी आताच सांगू शकत नाही. (All options are open for the Congress to defeat the BJP in the Goa Assembly elections)

गोव्यातील भाजप सरकारने कोविड महामारीच्या (covid 19) काळात गोव्यातील जनतेचे संरक्षण केले नाही अपुऱ्या वैद्यकीय सोयी सुविधांमुळे ऑक्सिजन अभावी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आदी नेते होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.