म्हापसा नगरपालिकेच्या निवडणुकांबाबत भाजपा विरोधातील सर्वच गटांनी व उमेदवारांनी पाळली सावधानता

Mapusa Municipal
Mapusa Municipal
Published on
Updated on

म्हापसा - म्हापसा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांबाबत सत्ताधारी भाजपा विरोधातील सर्वच गटांनी व उमेदवारांनी सध्या सावधानता पाळली आहे. त्यामुळे महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा प्रकारांत असलेली प्रभागांची राखीवता जाहीर झाल्यानंतरच पत्ते उघड करण्याचा निर्णय उमेदवारांनी व विविध गटांनी घेतलेला आहे.

सध्या राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष स्वत:च्या पक्षाला पूरक ठरणारी राखीवता जाहीर व्हावी, या दृष्टीने छुप्या मार्गाने प्रयत्नशील आहे व त्याचा फटका विरोधकांना बसू शकतो, या भीतीने विरोधकांपैकी विविध गटांनी प्रभागनिहाय उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. म्हापसा पालिकेवर मागच्या खेपेस सत्तास्थानी असलेल्या भाजपपुरस्कृत गटाला शह देण्यासाठी विरोधकांनी ही क्लृप्ती लढवली आहे.

सध्या म्हापसा पालिका निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी विरोधकांपैकी काँग्रेस, मगो अशा काही पक्षांचे स्थानिक नेते एकत्रित आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, म्हापसा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर कांदोळकर व मगोचे बाळू फडके यांचा समावेश आहे. म्हापशातील काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही त्या बैठकांत सहभागी झाले होते.

या निवडणुकांत काही मोजक्याच प्रभागांत जवाहरलाल शेट्ये व सुदेश तिवरेकर नेतृत्व करीत असलेल्या म्हापसा पीपल्स युनियनचे काही कार्यकर्तेही उतरणार आहेत. तसेच प्रवीण आसोलकर, गौरेश केणी इत्यादी मंडळी प्रतिनिधित्व करीत असलेल्या म्हापसा यूथच्या पदाधिकारीही उतरणार आहेत. तसे त्यांनी या पूर्वी घोषित केले आहे. तसेच वीसही प्रभागांत उमेदवार उतरवण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष किशोर राव यांनी जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किमान आठ-दहा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे या पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी या पूर्वीच स्पष्ट केले आहे. आगामी पालिका निवडणुकांत भाजपला टक्कर देण्यासाठी समविचारी पक्षांना व उमेदवारांना पाठिंबा देण्याचे अथवा त्यांच्याशी युती करण्याचे सूतोवाच अलीकडेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेता विजय सरदेसाई यांनी केले होते. त्यामुळे, अशा सर्व विरोधकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.

‘म्हापसा विकास आघाडी’ नामक त्या आघाडीचे नेतृत्व भाजपचे स्थानिक नेते रूपेश कामत यांनी केले होते. भाजप गटाला त्या वेळी वीसपैकी सतरा जागा प्राप्त झाल्या होत्या, तर विरोधकांपैकी मधुमिता नार्वेकर, अल्पा आनंद भाईडकर व शेखर बेनकर असे केवळ तीनच उमेदवार निवडून आले होते. तथापि, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच शेखर बेनकर हे अपक्ष नगरसेवक भाजपच्या गोटात सामील झाले होते व त्यामुळे सत्ताधारी भाजपची सदस्यसंख्या अठरावर पोहोचली होती. त्यानंतर सुधीर कांदोळकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजपविरोधी शक्ती एकत्र?
मागच्या पालिका निवडणुकीत म्हापशातील सर्व विरोधकांची मते विभागून गेल्याने त्याचा लाभ भाजपला झाला होता हे तर सर्वश्रुतच आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधातील शक्तींना एकत्रित करण्याचा विचार पुढे आला असून, त्या दृष्टीने चहापानाच्या निमित्ताने स्थानिक राजकीय नेत्यांच्या छोटेखानी बैठका घेतल्या जात आहेत. मागच्या पालिका निवडणुकीत तत्कालीन आमदार फ्रांसिस डिसोझा यांच्या पाठिंब्यावर भाजपपुरस्कृत उमेदवारांनी म्हापसा पालिकेवर निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते.

Edited By - Prashant Patil

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com