आपमध्ये प्रवेश केल्यानंतर एलिना साल्ढाणा गोव्यात दाखल !

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केल्यानंतर आज एलिना साल्ढाणा गोव्यात (Goa) परतल्या.
Alina Saldanha

Alina Saldanha

Dainik Gomantak 

Published on
Updated on

वास्को: भाजपच्या (Bjp) दोन वेळेच्या कुठ्ठाळीच्या आमदार आणि माजी वन आणि पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा (Alina Saldanha) यांनी दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केल्यानंतर आज त्या गोव्यात (Goa) परतल्या. यावेळी त्यांचे स्वागत आम आदमी पार्टीचे नेते प्रेमानंद नानोस्कर, वाल्मिकी नायक, यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Alina Saldanha</p></div>
एलिना साल्ढाणा यांचा आपमध्ये प्रवेश, प्रवीण झांट्ये मगोच्या वाटेवर

यावेळी पत्रकारांशी बोलताना श्रीमती एलिना साल्ढाणा म्हणाल्या की आपण आपल्या मतदारांच्या हितावह आम आदमी पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे सर्वेसर्वा यांनी मला वाटेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप सरकार मला तशी मोकळीक देत नव्हते. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. माझ्या लोकांसाठी काम करण्यासाठी मला मोकळीक हवी होती. तसेच इतर अनेक कारणामुळे भाजप मला सोडावा लागला. मी माझ्या सामान्य लोकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला असून, आप हा पर्याय मला योग्य वाटला असे त्या म्हणाल्या. माझ्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यास मी समर्थ आहे. भाजप 2012 सालचा आणि आताची भाजप, जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता भाजप लोका विरोधी निर्णयांचा असल्याचे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com