Aldona: फांदी कोसळून पाच जखमी, हळदोणेतील घटना; जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश

Aldona tree branch collapse: हळदोणा येथील सेंट थॉमस चर्चच्या आवारात असलेल्या घरावर आंब्याची मोठी फांदी कोसळून तीन लहान मुलांसह एका कुटुंबातील पाच जण जखमी झाले.
Aldona
AldonaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हळदोणा येथील सेंट थॉमस चर्चच्या आवारात असलेल्या घरावर आंब्याची मोठी फांदी कोसळून तीन लहान मुलांसह एका कुटुंबातील पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दीड वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, सर्वांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सेंट थॉमस चर्चचे केअरटेकर पीटर (मूळ तामिळनाडू) हे आपल्या कुटुंबासह चर्चच्या मालकीच्या या घरात वास्तव्यास होते. जखमींची नावे मेरी (६०), दासलीन (२५), लायका (६), दिव्या (४) आणि लिया (दीड वर्ष) अशी असून, हे कुटुंब मूळ तामिळनाडूचे आहे.

Aldona
Goa Premier League: धेंपो क्लबची नाट्यमय मुसंडी; अंतिम फेरीत धडक, पणजी जिमखान्याला नमविले

ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली. जखमींना तातडीने ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे प्रथम हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले.

Aldona
Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

दरम्यान, सोमवारी सकाळी म्हापसा अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले.

छतावरील कौले फुटून तुकडे घरात

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चच्या आवारातील आंब्याच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून बाजूला असलेल्या कौलारू घरावर कोसळली. फांदी कोसळल्यामुळे छतावरील कौले फुटून त्याचे तुकडे घरात पडले, ज्यामुळे घरात असलेले सर्वजण जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com