सरपंच प्रणेश नाईक प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती
Aldona sarpanch attack case
Aldona sarpanch attack caseDainik Gomantak

हळदोणाचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी मुख्य संशयित विजय कार्बोटकर याला म्हापसा पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. हळदोणाचे सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. (Aldona sarpanch attack case)

Aldona sarpanch attack case
शिरसईत प्रवासी बसची वीज खांबाला धडक

राकेश सुतार, जावेद बेल्लारी आणि अस्लम नाईक यांना अटक केली होती. मुख्य संशयित विजय कार्बोटकर याला अटक करण्यात आल्याने ही संख्या पाच झाली आहे. हळदोणा येथील निखिल पणजीकर याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सात जणांनी कारमधून येऊन नाईक यांच्यावर बार-अँड रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना हल्ला केला होता.

दरम्यान, म्हापसा पोलिसांना आणखी दोन आरोपींना पकडण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. मात्र पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com