Vijay Sardesai on AIMS in Goa: ‘एम्स’ची सुविधा गोव्यातही सुरू करावी- विजय सरदेसाईंचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे

मांडविया यांची दिल्लीत घेतली भेट:
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai सध्या नवी दिल्लीत ठाण मांडून असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची भेट घेऊन दक्षिण गोव्यातील विद्यमान जिल्हा रुग्णालयाचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) सुविधेत रूपांतर करावे अशी मागणी केली.

सरदेसाई यांनी आज त्यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना गोव्यातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेची माहिती दिली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचा ताबा खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यास विरोध करताना तसे झाल्यास दक्षिण गोव्यातील गरीब रुग्णांची परवड होईल याकडे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.

(Vijay Sardesai on AIMS in Goa)

दक्षिण गोव्यातील रहिवाशांना आणि विशेषत: सालसेत तालुक्यातील रहिवाशांना उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असे यापूर्वी म्हटले होते. या आपल्या वचनपूर्तीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आपण भेट घेतली असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

या बैठकीत त्यांनी एम्ससारख्या सुविधा असल्यास राज्याला अनेक फायदे मिळतील असे सांगितले. त्यात राज्यावर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा समावेश होता.

दक्षिण गोव्यातील हे इस्पितळ एम्सच्या सुविधेत रूपांतरित झाल्यास त्यात अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांसह विस्तृत श्रेणीतील विशेष वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

Vijay Sardesai
Manoj Parab: पोर्तुगिजांचा समान नागरी कायदाही मुख्यमंत्री बदलणार आहेत का?

‘एम्स’मुळे रुग्णसेवेत प्रगती शक्य

गोवा फॉरवर्डचे प्रमुख सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्र्यांना अशा उपक्रमामुळे होणाऱ्या फायद्यांची जाणीव करून दिली. राज्यामध्ये प्रतिभावान आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना राज्यातच कायम ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संशोधनाला चालना देण्याची संधी मिळेल. गोव्याला एक उत्कृष्ट वैद्यकीय केंद्र म्हणून स्थापित करण्याचे मार्ग खुले होतील.

येथे एम्स आल्यास अनेक गणमान्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी भागीदारी करून आरोग्य सेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक रुग्णसेवा यात प्रगती होईल. स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक आणि संलग्न साहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील.

अशा प्रतिष्ठित संस्थेच्या उपस्थितीमुळे या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक आकर्षित होतील, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com