गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Goa: गोव्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्तनांच्या कर्करोगाची मोफत तापसणी केली जाते
Human Lungs
Human LungsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणाऱ्या साधनांच्या मदतीने फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक साधने दोन्ही जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध केली जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.

राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणारी फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी उपकरणे उपलब्ध होतील. लवकर निदान, सुलभ उपचार आणि प्रगत तंत्रज्ञान याबाबत गोवा कर्करोगाच्या उपचारात आघाडीवर आहे, असे राणे म्हणाले.

गोव्यात दोन जिल्हा रुग्णालये आहेत, उत्तर गोव्यात म्हापसा आणि दक्षिण गोव्यातील मडगाव येथे जिल्हा रुग्णालय आहे.

राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्तनांच्या कर्करोगाची मोफत तापसणी केली जाते, असे राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Human Lungs
MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

याशिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्तन कर्करोगाच्या रुग्णांसाठी Pertuzumab-Trastuzumab कॉम्बो थेरपी मोफत दिली जाते.

दरम्यान, गोव्यात लवकरच टाटा मेमोरिअलच्या सोबतीने मल्टी स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय उभारले जाणार असून, याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com