Dumane: दुमाणेत अपघातांचे सत्र थांबेना! नियंत्रण सुटल्याने होताहेत दुर्घटना; सरंक्षक कठडा उभारण्याची होतेय मागणी

Dumane Accidents: आगोंद ते काणकोण या मुख्य रस्त्यावर दुमाणे येथील उतरणीवरील तीव्र वळण धोकादायक ठरत असून येथे वारंवार अपघात घडत आहेत.
Dumane Accidents
Dumane AccidentsDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: आगोंद ते काणकोण या मुख्य रस्त्यावर दुमाणे येथील उतरणीवरील तीव्र वळण धोकादायक ठरत असून येथे वारंवार अपघात घडत आहेत. दुचाकी, चारचाकी तसेच अन्य वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अनेक अपघात झाले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे.

मंगळवारी महाराष्ट्रातील एका पर्यटकाच्या चारचाकीचा याच ठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला. त्यामुळे या ठिकाणी त्वरित संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

Dumane Accidents
Baina Accident: बायणात भरधाव कारचा थरार! 3 वाहनांना दिली धडक; नियंत्रण जाऊन गाडी झाली पलटी

काणकोण तालुक्यातील दुमाणेपासून सुमारे १०० मीटर अंतरावर खटखटे येथील उतरणीवर हे तीव्र वळण आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास येथे झालेल्या भीषण अपघातात आगोंद येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

Dumane Accidents
Goa News: राम नगर-धारवाड रस्त्यावर भीषण अपघात

तो चावडी, काणकोणकडे जात असताना वाहनावरील ताबा सुटून तो रस्त्याखाली कोसळला. गेल्या काही दिवसांत लहान-मोठे अनेक अपघात येथे घडले आहेत. या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी आगोंद स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष नितीन देसाई, सूरज नाईक गावकर तसेच अन्य वाहनचालकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com