Baina : उत्तर गोव्यानंतर आता दक्षिण गोव्यातून तीन लाखांचे मोबाईल जप्त

मुरगाव पोलिसांची कारवाई, पुढील तपास सुरु
Mormugao Police
Mormugao PoliceDainik Gomantk

Baina : उत्तर गोव्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता परप्रांतीय मोबाईल चोरांनी आपली मोहीम दक्षिण गोव्याकडे वळवली आहे. वास्को-बायणा समुद्रकिनारी मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात मुरगाव पोलिसांना यश आले आहे. वास्को-बायणा समुद्रकिनारी बोटिंग, स्कुबा डायव्हिंग व आंघोळीसाठी आले असता, यातील एका पर्यटकाचा मोबाईल चोरीस गेल्याचे नजरेस आले.

Mormugao Police
Mayem Lake : मयेतील पर्यटनाला तब्बल 8 वर्षांनंतर पुर्नवैभव; गोवा टुरिझमचा पुढाकार

या चोरीप्रकरणी पर्यटकांनी मुरगाव पोलिस स्थानकावर तक्रार नोंद केली. पोलिसांनी त्वरित हरवलेला मोबाईल ट्रेस केला असता मोबाईल चोरट्याला वास्को एफएल गोम्स रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी मोबाईल चोरटा मोहम्मद युसूफ हुसेन शेख याची अधिक तपासणी केली असता, त्याच्याकडून अंदाजे तीन लाख रुपयांचे आणखीन दहा मोबाईल्स जप्त केले. याप्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्टेनली गोम्स अधिक तपास करीत आहेत.

Mormugao Police
Mohan Bhagwat : भाजप सत्तेसाठी भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतो... सरसंघचालक कडाडले

तपासणीत मिळाली माहिती

मुरगाव पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी पकडलेल्या मोहम्मद युसूफ हुसेन शेख याची अधिक तपासणी केली असता, त्याने आणखीन दहा मोबाईल फोन चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मोबाईल्स जप्त केले. पोलिसांनी मोबाईल चोरट्याला वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com