एक्सपोझिशन काळातील मास मराठीत होणार; मुंबईकर आणि स्थानिकांच्या मागणीनंतर आर्चबिशप यांची सूचना

Saint Francis Xavier Exposition: या सोहळ्यात कोकणी, तमिळ, मल्याळम, हिंदी, कन्नड, फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये मास होणार आहे.
एक्सपोझिशन काळातील मास मराठीत होणार; मुंबईकर आणि स्थानिकांच्या मागणीनंतर आर्चबिशप यांची सूचना
Saint Francis Xavier ExpositionDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Exposition

पणजी: गोव्यात पुढील महिन्यापासून होऊ घातलेल्या संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन सोहळ्याला आता काही दिवस उरले आहेत. सोहळ्याच्या निमित्ताने दररोज होणारे मास मराठीत देखील व्हावे अशी मागणी मुंबई आणि स्थानिक कॅथलिक नागरिकांनी केली. या मागणीला मान देऊन मराठीतून देखील मास घेण्याची सूचना आर्चबिशप यांनी केली आहे.

संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन सोहळा येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या सोहळ्यात कोकणी, तमिळ, मल्याळम, हिंदी, कन्नड, फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये मास होणार आहे. यात मराठीचा देखील समावेश करावा अशी मागणी मुंबईतील वॉचडॉग फाऊंडेशनने केली.

मुंबई आणि वसईतील अनेक कॅथलिक नागरिक गोव्यात हा महोत्सवाला हजेरी लावत असतात. विविध परदेशी भाषांमध्ये मास होत असताना मराठीत होणार नाही, हे धक्कादायक आहे, असे फाऊंडेशनच्या सदस्यांनी म्हटले आहे.

मराठी कोकणीनंतर गोव्याची दुसरी अधिकृत भाषा आहे, तसेच शेजारी महाराष्ट्रात मराठी बोलली जाते, त्यामुळे मराठीत मास घेण्याची मागणी जोर धरु लागली.

एक्सपोझिशन काळातील मास मराठीत होणार; मुंबईकर आणि स्थानिकांच्या मागणीनंतर आर्चबिशप यांची सूचना
खूषखबर! 'काजू फेणी' जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत; ‘काजकार’ला मिळाले GI Certification

मुंबईतील वॉचडॉग फाऊंडेशनने याबाबत गोवा आर्चडायोसिस यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. तसेच, मराठी मासच्या समावेशाची मागणी केली. देशातील प्रसिद्ध कॅथलिक पवित्र ठिकाणांवर मराठीचा वापर केला जातो, असे फाऊंडेशनच्या पत्रात म्हटले आहे.

पत्राची दखल घेऊन अखेर सोहळ्यात मराठी मासचा समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com