फालेरो यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेसमध्ये 4 आमदार शिल्लक

त्यामुळे आता गोवा विधानसभेतील (Goa Legislative Assembly) आमदारांची संख्या 39 झाली असून काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाच वरुन चार वर आलेली आहे.
Luisin Falero
Luisin FaleroDainik Gomantak

पणजी: काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो (Luisin Falero) यांनी आज सकाळी सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे काँग्रेस आमदारकीचा जो राजीनामा सादर केला होता तो सभापती राजेश पाटणेकर यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे आता गोवा विधानसभेतील आमदारांची संख्या 39 झाली असून काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाच वरुन चार वर आलेली आहे. अद्यापही काँग्रेसचे इतर नेते राजीनामा देण्याची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत .काँग्रेसचे कुणी आमदार जरी राजीनामा देणार असल्याचे अध्याप वृत्त नसले तरी बडे पदाधिकारी फालेरो यांच्यासोबतच तृणमूल मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Luisin Falero
Luizinho Faleiro: काँग्रेसमध्ये दुःख सहन केले म्हणत...

2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकूण 17 आमदार निवडून आले होते. मतमोजणीनंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरत नसल्याच्या कारणामुळे वाळपईचे आमदार विश्‍वजित राणे यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेच घडामोडी होऊन गोवा फॉरर्वड व मागोच्या सहकार्याने १३ आमदार निवडून आलेल्या भाजपाने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनीही काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला व पोटनिवडणुका लढवल्या होत्या. आणि दीड वर्षांपूर्वी एकाच वेळी तब्बल कॉंग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. अशाप्रकारे कॉग्रेस ला खिंडार पडत गेले . आज निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ काँग्रेस नेते व गांधी घराण्याशी जवळीक असलेले लुईझीन फालेरो यांनी राजीनामा दिल्यामुळे हे खिंडार आणखीनच रुंदावले आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com