Advocate Ankur Kumar Attack: मोरजीत मारहाण; संशयित ध्रुव, दिलीप यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी; अन्य साथीदारांचा शोध सुरू

Advocate Ankur Kumar Morjim Attack: मारहाण प्रकरणात अटक केलेले संशयित ध्रुव दिलीप मोर्जे आणि दिलीप लोशन मोर्जे या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Advocate Ankur Kumar Attack
Advocate Ankur Kumar AttackDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: तेमवाडा परिसरातील बांधकामे पाडण्याच्या न्यायालयाच्या आदेशावरून उदभवलेल्या वादातून केलेल्या मारहाण प्रकरणात अटक केलेले संशयित ध्रुव दिलीप मोर्जे आणि दिलीप लोशन मोर्जे या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करत दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.

Advocate Ankur Kumar Attack
Goa Dairy Consultant Appointment: कन्सल्टंट नियुक्तीखाली पैशांची उधळपट्टी; गोवा डेअरीवर दूध उत्पादकांचा आरोप

अशिलासह आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी ॲड. अंकुर अनिलकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांद्रे पोलिसांनी ध्रुव मोर्जे, दिलीप मोर्जे यांच्यासह अन्य दहा जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Advocate Ankur Kumar Attack
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

या प्रकरणात १८ जुलै रोजी ध्रुव आणि दिलीप या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती मांद्रे पोलिस ठाण्याचे निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com