Road Safety Awareness : वाढते अपघात रोखण्यासाठी ‘४-ई’ धोरण स्वीकारा; गोवा रस्ता सुरक्षा मंच
Road Safety Awareness :
पणजी, राज्यात रस्तेअपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी विशिष्ट संख्येने रस्तावाहतूक सुरक्षाविषयक व्याखाने ऐकण्याची सक्ती केली पाहिजे, अशी मागणी गोवा रस्ता सुरक्षा मंचचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.
संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेले ‘४-ई’ हे धोरण राज्य सरकारने स्वीकारावे. कारण त्याद्वारे रस्तेअपघातांत बळी पडणाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी संजीव सरदेसाई आणि मंचचे अन्य सदस्य उपस्थित होते. ‘४-ई’मध्ये एज्युकेशन, इंजिनीअरिंग, अंमलबजावणी आणि अपात्कालीन वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे.
एज्युकेशनमध्ये वाहनचालकांना वाहतूक नियमांबाबत योग्य शिक्षण देणे, इंजिनीअरिगमध्ये योग्य रस्ते, एन्फोर्समेंटमध्ये नियमांची प्रभावी अंमलबजावणी तर इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये अपघात झाल्यानंतर वेळेत वैद्यकीय सेवा मिळणे यांचा समावेश आहे, असे नाईक म्हणाले.
सरदेसाई यांनी सांगितले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी आधी वाहतूक चालकांना योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.
त्यांना केवळ गाडी चालवता येते म्हणून परवाना देऊ नये. त्या व्यक्तीला वाहतुकीचे नियम माहिती आहेत का?, ती व्यक्ती एक जबाबदार चालक आहे का? याचीही माहिती घेणे गरजेचे आहे. सर्व वाहतूक नियमांचे योग्य पद्धतीने पालन होण्यासाठी अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे.
वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी धोरण आखणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेले ‘४-ई’ हे धोरण अनेक प्रगत देशांनी स्वीकारले आहे. मात्र आम्ही वारंवार निवेदन देऊन देखील सरकारने अद्यापही याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.
- दिलीप नाईक, अध्यक्ष (गोवा रस्ता सुरक्षा मंच)
अपघात रोखण्यासाठी आधी चालकाला वाहतूक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्या सरकारतर्फे विविध महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षेबाबत जागृती केली जातेय. अशी ठराविक व्याख्याने पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच वाहन परवान्यासाठी पात्र समजावे.
- संजीव सरदेसाई, सदस्य (गोवा रस्ता सुरक्षा मंच)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.