Rakul-Jackky Wedding: वधू रकुल - वर जॅकी; स्थळ गोवा, हॉट कपलची लग्नपत्रिका व्हायरल

बॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व निर्माता जॅकी भगनानी लवकरच गोव्यात लग्न करणार आहेत.
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Invite
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding InviteDainik Gomantak

Rakul-Jackky Wedding

बॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता व निर्माता जॅकी भगनानी लवकरच गोव्यात लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नाची लग्नपत्रिका समोर आली आहे.

रकुल आणि जॅकी परदेशात लग्न करणार होते. पण, डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेड इन इंडिया असे आवाहन केल्यानंतर दोघांनीही भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Invite
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding InviteDainik Gomantak

रकुल आणि जॅकीची लग्नपत्रिका सोशल मिडियावर व्हायरल झाली असून, 21 फेब्रुवारीला दोघे गोव्यात साध्या पद्धतीने लग्न करतील.

लग्न अतिशय खासगी ठेवण्याचा निर्णय दोघांनी घेतला असून, केवळ काही मर्यादीत आणि जवळच्या लोकांनाच लग्नासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

मनोरंजन विश्वातील बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या विविध माध्यमांवर रकुल आणि जॅकीच्या लग्नाबाबत अनेक माहिती समोर येत आहे.

बातम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, रकुल आणि जॅकी 19 आणि 20 फेब्रुवारीला गोव्यात प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहे. यानंतर 21 फेब्रुवारीला दोघांचा लग्न समारंभ असेल.

रकुल आणि जॅकी जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2022 मध्ये तिच्या वाढदिवशी रकुलने एका पोस्टच्या माध्यमातून जॅकीसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली होती.

रकुल आणि जॅकी यांना हा सोहळा खासगी ठेवायचा आहे. त्यामुळे केवळ मर्यादीत लोकांना या लग्न सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, या लग्नात सहभागी होणाऱ्या लोकांना लग्नाच्या स्थळी मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल, अशीही माहिती समोर आली आहे.

रकुल आणि जॅकी यांच्यातील प्रेमकाहिणीचा गोव्यातूनच सुरुवात झाली होती, त्यामुळे गोव्यासाठी दोघांच्या मनात विशेष प्रेम आहे. याच कारणामुळे दोघांनी गोव्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com