गोवा काँग्रेस कार्यकर्त्यांत चेतना जागविण्यासाठी उपक्रम...

अमित पाटकर: कुंकळ्ळीतून काँग्रेसची चेतना यात्रा सुरू
Amit Patkar
Amit Patkardainik gomantak

कुंकळ्ळी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आयोजित केलेली चेतना यात्रा पक्षबदलूंना पक्षात पुनर्प्रवेश देण्यासाठी किंवा पक्ष सोडून गेलेल्यांच्या घरवापसीसाठी नाही. कार्यकर्त्यांत नवी ऊर्जा व चेतना जागविण्यासाठी ‘चेतना यात्रे’चा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुंकळळी येथे सांगितले. पत्रकार व सोशल मीडियावर काही काँग्रेसविरोधी नेटिझन काँग्रेस पक्षाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी नकारात्मक प्रचार करीत असल्याचा आरोप पाटकर यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. शेख, प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा, व्हेरीयाटो फर्नांडिस व इतर नेते उपस्थित होते.

Amit Patkar
Goa Updates: पंच सदस्याला हवी 6 लाखांची लाच!

ज्यांनी पक्षासाठी कार्य केले व काम करण्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांच्याशी जोडण्यासाठी ही ‘चेतना यात्रा’ असल्याचे पाटकर म्हणाले. पक्षाने विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरविले; मात्र अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त झाले नाही म्हणून खचून जाण्याचे काहीच कारण नाही. आज काँग्रेसचे 11 आमदार आहेत पुढील पाच वर्षे जनतेशी जोडून कार्य करीत राहिल्यास बावीस आमदार निश्चित निवडून येणार असा विश्वास पाटकर यांनी व्यक्त केला.भाजपाविरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com