Govind Gawde
Govind Gawde Dainik Gomantak

कामचुकारांवर कारवाई केली जाणार: गोविंद गावडे

कुर्टी क्रीडा संकुलाला दिली अचानक भेट
Published on

फोंडा: राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राज्यभरातील क्रीडा संकुलांना आकस्मिक भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी करण्याचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी सकाळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी कुर्टीतील क्रीडा संकुलाला आकस्मिक भेट देऊन तेथील गैरसोयीची पाहणी केली.

या भेटीदरम्यान काही प्रशिक्षकच कामावर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे गलथानपणा मुळीच खपवून घेणार नाही, कामचुकारांवर कारवाई केली तर कुणी राजकीय वशिला आणू नये. कामचुकारांची गय करणार नसूनक्रीडा खात्यात शिस्त ही आणणारच असा इशारा गोविंद गावडे यांनी यावेळी दिला.

Govind Gawde
'तेरखोल' रेती उपसाप्रकरणी गोवा खंडपीठाकडून गंभीर दखल

कुर्टी येथील क्रीडा संकुलात आवश्‍यक सोयीसुविधांचा अभाव आहे. मागच्या काळात या खात्याकडे अक्षम्य दुर्लक्षच झाले आहे. मध्यंतरीच्या काळात कोविड महामारीमुळे खात्यात उदासीनता आली होती, मात्र आता कोविड महामारीचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आले आहे, मात्र सरकारच्या विविध खात्यात कामचुकारपणा वाढीस लागला असून आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याला ते मारक ठरत आहे.

गोविंद गावडे यांनी सकाळी जलतरण तलाव, क्रीडा मैदान, व्यायामशाळा तसेच बॅडमिंटन कोर्ट आदीची पाहणी केली. आवश्‍यक सुविधा उपलब्ध करताना आहे त्या सुविधांचा योग्य वापर करून त्या सुधारण्यात येईल, आणि येत्या सहा महिन्यात कुर्टीतील क्रीडा संकुलाला एक नवा साज मिळेल, असे गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी या खात्याचे वरिष्ठ अभियंता दीपक लोटलीकर तसेच अन्य अधिकारी व प्रशिक्षक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com