Goa: विर्डी-साखळीत छापा टाकून 65 क्यूबीक मीटर रेती केली जप्त

उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा नोडल अधिकारी अजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाण खात्याचे भूगर्भ तज्ज्ञ श्याम सावंत यांची ही संयुक्त कारवाई.
Action taken in by Revenue department
Action taken in by Revenue departmentDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी विर्डी-साखळी येथे छापा टाकून बेकायदेशीररित्या उत्खनन करून साठा केलेली 65 क्यूबीक मीटर रेती जप्त केली. नंतर ही रेती जेसीबी यंत्राच्या सहकार्याने मांडवी नदीत टाकण्यात आली. उत्तर गोव्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा नोडल अधिकारी अजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाण खात्याचे भूगर्भ तज्ज्ञ श्याम सावंत यांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.6) ही संयुक्त कारवाई करण्यात आली. (Action taken by the revenue department in the chain on illegal sand dredging)

या कारवाईवेळी डिचोली मामलेदार कार्यालयाचे सर्कल निरीक्षक सहदेव मोटे, तलाठी अजित गावकर उपस्थित होते. मागील मे महिन्यात मामलेदार श्री. पंडित यांच्या नेतृत्वाखाली विशेष भरारी पथकाने विर्डीपासून जवळ असलेल्या आमोणे येथे छापा टाकून 90 क्युबीक मीटर रेतीसाठा जप्त करून मांडवी नदीत टाकला होता.

Action taken in by Revenue department
विद्यार्थ्यांनी स्वप्ने जीवंत ठेवून जीवनाची वाटचाल करावी: मंत्री मायकल लोबो

दरम्यान, या कारवाईनंतर त्यानंतर काही दिवस बेकायदा रेती व्यवसायावर काहीसे नियंत्रण आले होते. आजच्या या कारवाईमुळे डिचोली तालुक्यात पुन्हा बेकायदा रेती उत्खनन होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com