कळंगुट: हणजुणच्या होली बासीलला ठोकले टाळे

मुख्यमंत्र्यांनी दिले होते बेकायदा मसाज पार्लर व डान्सबारवर कारवाईचे आदेश
illegal-massage parlor
illegal-massage parlorDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर सोमवारी सकाळी हणजुण येथील होली-बासील या बेकायदा मसाज पार्लरवर छापा टाकला आहे. यावेळी तेथील अवैद्य व्यवसाय बंद पाडल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बै मसाज सेंटरला मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. तसेच म्हापसा पोलिस उप-अधिक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुढेही राज्यातील किनारी भागात बेकायदा चालणाऱ्या मसाज पार्लस, डान्सबार तसेच नाईट क्लब्सवर कारवाई चालूच राहाणार असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ( Action on illegal massage parlors and dance bars)

यावेळी बार्दैशातील कळंगुटपासून बागा आणि हणजुण पासून वागातोर पर्यंतच्या परिसरात अनेक मसाज पार्लस कार्यरत असून त्याप्रमाणे बहुतेक मसाज पार्लस बेकायदा कार्यरत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे कळंगुटातील ग्रामस्थांनी अनेकदा यासंबंधात आवाज उठवला होता. तसेच स्थानिक राजकीय लोकांच्या तसेच पोलिस यंत्रणांच्या छुप्या मदतीनेच अशा प्रकारचे बेकायदा व्यवसाय याभागात खुलेआम चालल्याची कुणकुण लागली होती. यामुळे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी कळंगुट व परिसरात भेट देत याभागाची पाहाणी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी कळंगुटच्या पोलिस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किनारी भागातील बेकायदा चालणाऱ्या मसाज पार्लससहित डान्सबार तसेच नाईटक्लबवर सोमवार पासून धडक कारवाईचे पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करतांना सोमवारी (ता. 6) म्हापसाचे नवनियुक्त उप-अधिक्षक जीवबा दळवी यांनी हणजुण पोलिस स्थांनकाचा तात्पुरता ताबा घेतला होता. या कारवाईवेळी पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्यासह हणजुणमध्ये गेली चार वर्षे खुलेआम व्यवसाय थाटून बसलेल्या होली-बासील या बेकायदा मसाज पार्लवर आकस्मिक धाड घातली गेली.

या धाडीत महागड्या तेलाच्या बाटल्या, खाटा, खुर्च्या, नांव नोंदणीची पुस्तके तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी सदर मसाजच्या तामीळनाडूस्थित व्यवस्थापकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या तीन दिवसांच्या रिमांडवर त्याची रवानगी हणजुणच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी मामु हागे यांच्या आदेशानुसार मंगळवारी सदर मसाज पार्लरला कायदेशीर टाळे ठोकण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com