मडगावात रस्‍त्‍यांवर बेकायदा 'विक्री' करणाऱ्यांवर कारवाई

विक्रेत्‍यांचा माल ही जप्त करण्यात आला.
Action against illegal sale on roads
Action against illegal sale on roads Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव शहर स्वच्छ ठेवण्याच्या इराद्याने नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी नगरपालिका कर्मचारी व पोलिसांच्या साहाय्याने रस्‍त्‍यावर अतिक्रमण करुन बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच त्यांचा माल जप्त केला. ही कारवाई घाऊक मासळी मार्केट, एसजीपीडीए, केटीसी बसस्‍थानक येथील विक्रेत्‍यांवर करण्यात आली. शिवाय कोलवा सर्कल जंक्शनकडे जे भिकारी वाहनचालकांना त्रास देत होते, त्यांचाही बंदोबस्त करण्यात आला.

या कारवाईत किती किमतीचा माल जप्त केला याला महत्व नाही, पण मडगाव शहर स्वच्छ रहावे व अशा बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लोकांची मागणी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली, असे नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी या प्रतिनिधीला सांगितले.

Action against illegal sale on roads
काणकोण वासीयांना भिवपाची गरज ना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

त्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्‍याचे ते म्‍हणाले. ही कारवाई केवळ एका दिवसापुरती नसून मडगावात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे रस्ता अतिक्रमण करुन विक्री चालू आहे, त्या सर्व ठिकाणी क्रमाक्रमाने कारवाई केली जाईल असा इशाराही नगराध्यक्षांनी दिला.

दरम्‍यान, या कारवाईचे मडगावात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. समाजसेवक व उद्योजक विवेक नाईक म्हणाले की, अशी कारवाई आवश्यकच होती. त्यामुळे शहर स्वच्छ राहील. तर, नगरसेवक महेश आमोणकर म्हणाले की नगरपालिकेने बेकायदेशीर स्क्रॅप यार्ड, गाडे, भाजी व फळ विक्रेत्यांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. खारेबांद, पेड, सडेकर लेन, तेथील फूटपाथवर जे बेकायदा धंदे सुरू आहेत, ते पण बंद करावे अशी मागणी आमोणकर यांनी केली. डॉ. ह्युबर्ट गोम्स यांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com