निवृत्त मुख्याध्यापकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अखेर गजाआड !

अभिषेक हिरेमठ (Abhishek Hiremath) या युवकाने 2018 साली आपल्या शिक्षिकेला दुचाकीची धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे.
Abhishek Hiremath
Abhishek HiremathDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: असोलडा येथील निवृत्त मुख्याध्यापकच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेल्या अभिषेक हिरेमठ (Abhishek Hiremath) या युवकाने 2018 साली आपल्या शिक्षिकेला दुचाकीची धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे.

Abhishek Hiremath
दाबोळी येथे सांडपाण्याची सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाहणी...

काकूमडी केपे येथील अभिषेक हिरेमठ हा सध्या केपे पोलिसांच्या ताब्यात आहे.अभिषेक हा शेलडे येथील सरकारी विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून तो अत्यंत हुशार होता व त्याने या विद्यालयातून दहावीत प्रथम क्रमांक पटकावला होता. दहावीत असताना शिक्षिकेने आपल्याला मारले होते व या कारणाने आपल्याला वर्गात सर्वासमोर शरमेने मान खाली घालावी लागली होती याचा राग आपल्या मनात होता व याच कारणाने 2018 साली सदर शिक्षिकेला दुचाकीची धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता तो सफल होऊ शकला नव्हता व त्याच कारणाने आपण दिं. 8 रोजी त्यांच्या घराची कौले काडून आत शिरलो व शिक्षिकेच्या पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता असे हिरेमठ यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com