Forest In Goa: गोव्याचे वनक्षेत्र वाढले! केंद्र सरकारचा अहवाल जाहीर; आच्छादित क्षेत्रात सकारात्मक कामगिरी

Forest coverage in Goa: केंद्र सरकारने वन आच्छादित क्षेत्रांचा राज्‍यनिहाय अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्‍यात गोव्‍यातील एकूण वन क्षेत्रात किंचित वाढ झाली आहे.
forest coverage in Goa
Forest Area InvasionDainik Gomantak
Published on
Updated on

Central government forest coverage report Goa increase

पणजी: केंद्र सरकारने वन आच्छादित क्षेत्रांचा राज्‍यनिहाय अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्‍यात गोव्‍यातील एकूण वन क्षेत्रात किंचित वाढ झाली आहे.

राज्‍यात २०१७ मध्‍ये २२२९ चौ.कि.मी., २०२९ मध्‍ये २२३७ चौ.कि.मी., तर २०२३ च्‍या अहवालात हा आकडा २२६५.७२ चौ.कि.मी.वर पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी पश्चिम घाटात आगीच्‍या मोठ्या घटना घडल्‍या होत्‍या. त्‍यानंतर मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्‍यात आले. त्‍यामुळे वन आच्छादित क्षेत्रात वाढ झाली आहे, असे मानले जात आहे.

forest coverage in Goa
Goa Tourism: सरकारचा अहवाल खोटा? गोव्यात 50 टक्के पर्यटक कमी झाल्याचा शॅकमालकांचा दावा

१९८८ च्या राष्ट्रीय वन धोरणानुसार, भौगोलिक क्षेत्राच्या किमान ३३ टक्के भागात जंगले असणे आवश्यक आहे. त्‍यानुसार गोव्‍यात वन क्षेत्र अधिक आहे. हवामान बदल मंत्रालयाकडून दरवर्षी राज्‍यांचा आढावा घेण्‍यात येतो. ‘राज्‍य जैवविविधता’तर्फेही वन वाढीसाठी प्रयत्‍न केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com