Borim: पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता नंतर मात्र 'जैसे थे'! मोठ्या चरीमुळे अपघातात वाढ; बोरीत रहिवासी त्रस्त

Borim Road: पाईपलाईन घालण्यासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे राहून गेल्याने बोरी नव्या पुलावरील बोगदावजा रस्ता बाग-तिशे-बोरी येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Borim Road Accidents
Borim RoadDainik Gomantak
Published on
Updated on

Borim Road Pipeline Issue

बोरी: पाईपलाईन घालण्यासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे राहून गेल्याने बोरी नव्या पुलावरील बोगदावजा रस्ता बाग-तिशे-बोरी येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

बऱ्याच कालावधीपासून बोरी गावातून जाणारा रस्ता ठिकठिकाणी खोदून त्यातून मोठी पाईप घालण्यात आली आहे. हे काम सुरू असताना रस्त्यावर वाहनांची कोंडी होत असते. बोरी नव्या पुलाचा जो बोगदावजा रस्ता शिरोडा-सावर्डे-कुडचडेच्या बाजूने जातो, त्या रस्त्याचा अर्धाअधिक भाग खोदून त्यात पाईप घातले.

बाग-बेतकीचा रस्ता अशाचप्रकारे खोदला गेला आहे. तिशे-बोरी जुन्या पुलाच्या शेजारच्या रस्त्यावर तर मोठाच चर पडलेला आहे. या चराची तत्काळ दुरुस्ती करून त्याचे सपाटीकरण करायला हवे होते. परंतु तसे न केले गेल्याने दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनांना बाजू देतेवेळी अपघात घडतात. तिशेच्या रस्त्यावरील खड्ड्यात काही दुचाकी वाहने पडून अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे दुरुस्तीकाम करून त्यावर डांबरीकरण करावे व रस्त्यावर घडणारे अपघात रोखावेत, अशी मागणी वाहनचालक आणि रहिवाशांची आहे.

बोरीतील हमरस्त्याच्या रुंदीकरणाला सुरवात

बोरी गावातून जाणारा हमरस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनांना बाजू देताना खूपच त्रास पडत होते. या अरुंद रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत असल्याने वाहतूक कोंडी होत हेती. मात्र, आता हमरस्त्याच्या रुंदीकरणाला प्रारंभ झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

बोरीचा नवा पूल झुआरी नदीवर उभारला जाणार असून त्याची अधिसूचनाही जाहीर केली गेली आहे. जलस्त्रोत व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर येथील रस्त्याचे रुंदीकरण करून घेण्यास प्रयत्नशील असून कोणाचीच घरे, आस्थापने, धार्मिक स्थळांना बाधा न करता काम होईल. त्याप्रमाणे बायथाखोल-बोरी, कोपले ते साकवापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी शेजारची झुडपे तोडून मातीचा भराव घालून रस्ता रुंद करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

Borim Road Accidents
'Cash For Job' चे आणखी एक प्रकरण! शिक्षण खात्यात नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक; संशयितास अटक

बोरीच्या नव्या पुलाचा पायाभरणी समारंभ काही कालावधीत होणार असून दोन्ही बाजूनी जोड रस्ते बांधण्याच्या कामांनाही लवकरच सुरवात होणार आहे. बोरी पंचायतीचे सरपंच जयेश नाईक आणि पंचायत मंडळ रस्ता रुंदीकरण करण्यासंबंधी सहकार्य करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com