

राज्यात अपघातांची मालिका वाढली असून दिवसेंदिवस घडणारे अपघात आता चिंताजनक बनले आहेत. रेडीघाटी येथे एका कारचा स्वयं अपघात घडला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यामध्ये चालक सुखरूप बचावला आहे.
दुसरीकडे, कुडचडे येथे झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, काकूमोड्डी येथे अॅक्टिव्हा दुचाकी आणि चारचाकी बलेनो कार यांच्यात टक्कर झाली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात दोघांचे पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनेत, नेमकी चूक कुणाची हे अद्याप कळू शकलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.