Goa Board: शैक्षणिक वर्षाला सुरूवात, मात्र ऑनलाईनच भरणार वर्ग

online education.jpg
online education.jpg

पणजी:  गोवा (Goa) राज्यातील शैक्षणिक वर्ष (Academic Year) सुरू झाले.  पहिली ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने वर्ग (Online Classes) घेण्यात येणार आहेत.  दुसरीकडे दहावी व बारावीचा  निकाल  तयार करण्याच्या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने अकरावीचे वर्ग ऑगस्टमध्ये सुरू होण्याची होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारिमुळे (Covid-19 Pandemic) केंद्र सरकार बरोबरच  गोवा सरकारनेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यांकन गुणाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे. (Academic year has started in Goa and classes will be taken online)

गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या पूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळ सरकारचे बारावीचे धोरण जाहीर होण्याची वाट पाहात आहे. इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यानुसार   गुणतालिका तयार करून निकाल जाहीर केला जाणार आहे. तो लवकरात लवकर जाहीर करण्याचे प्रयत्न शिक्षण मंडळ करणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

त्याचबरोबर दहावीच्या परीक्षा निकालासाठीचे धोरण यापूर्वी सरकारने जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार योग्य त्या प्रक्रियेद्वारे गुण जुळवण्याचे काम सुरू आहे.  दहावी व बारावीच्या निकालासाठी काही प्रक्रिया समान असतील, मात्र बारावीसाठी  काही प्रक्रिया वेगळ्या आहेत. असे  शेट्ये यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष झाले सुरु...

आज तारीख 21 जून पासून 2021-22चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावण्यात येत नसले तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेमध्ये आजपासून बोलावण्यात आले आहे. शिक्षक प्रत्येक शाळामधून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना रेंजची समस्या आहे त्यांना अभ्यास घरपोच पाठवला जाईल. आज पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये  जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com