Theft
TheftDainik Gomantak

शिक्षिकेच्या घरी चोरी करणाऱ्या अभिषेकचे कारनामे उघड !

अभिषेक हिरेमठ याने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात शिक्षिकेच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता अशी बाब आता पुढे आली आहे.
Published on

आपल्या माजी शिक्षिकेला (Teacher) जिवंत जाळण्‍याच्‍या प्रयत्नात पकडला गेल्यावर सध्या चर्चेत असलेला अभिषेक हिरेमठ याने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात याच शिक्षिकेच्या घरी चोरी (Theft) करण्याचा प्रयत्न केला होता अशी बाब आता पुढे आली आहे.

अभिषेक पहाटेच्या वेळी चोरी करण्यासाठी असोल्‍डा येथे शिकेरकर शिक्षिकेच्‍या घरी आला होता. पण त्याचवेळी कुणाला तरी जाग आली त्यामुळे त्याने तेथून पळ काढला. पण त्यावेळी जवळच असलेल्या एका मंदिराचे बांधकाम करण्यासाठी तेथे कामगार आणले होते. हा चोरीचा प्रयत्न त्या कामगारांपैकीच कुणी तरी केला असावा असे वाटल्याने अभिषेकवर कुणी संशय घेतला नाही.

Theft
'त्या' बलात्कार प्रकरणातील संशयित निर्दोष !

पण मागच्या सोमवारी अभिषेक पुन्हा शिकेरकर यांच्या घरी चोरी करण्यासाठी आला आणि पकडला गेला. शिक्षिकेचा पती लक्ष्मीकांत शिकेरकर यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता शिकेरकर यांना जाग आल्याने तो सापडला. नंतर पोलिसांना माहिती देताना आपण दहावीत शिकताना सदर शिक्षिकेने आपल्याला मारहाण केली होती व त्‍या रागातून आपण तिला जिवंत मारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो अशी कबुली दिली होती. यावेळीही तो चोरी करण्याच्या उद्देशानेच शिकेरकर यांच्या घराची कौले काढून घरात शिरला होता.

२०१५ मध्‍ये शिक्षिकेची काढली होती छेड

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकने 2015 साली आपल्या या शिक्षिकेची छेड काढली होती. त्यावेळी त्याने तिला मोबाईलवर अश्लील संदेश पाठविले होते. या प्रकरणी केपे पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्‍यात आली होती. मात्र त्यावेळी अभिषेक अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. मात्र पोलिसांनी त्याला व त्याच्या वडिलांना पोलिस स्थानकावर आणून सज्जड दम दिला होता. त्यावेळी वडिलाने अभिषेकला त्या शिक्षिकेची सर्वांसमक्ष माफी मागण्यास लावली होती. आणि याच कारणामुळे अभिषेक आणखी प्रक्षुब्ध झाला होता. याचा बदला घेण्याचे त्याने मनात ठरविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com