Luxury House in Goa: अभय देओलचं गोव्यातील आलिशान 'ग्लास हाऊस', लक्झरी सुविधा पाहून व्हाल थक्क

Abhay Deol Glass House In Goa: बॉलिवूड अभिनेता अभय देओल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतो.
Abhay Deol Glass House In Goa
Abhay Deol Glass House In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Abhay Deol Buys Stunning Glass House in Goa Shares Video

बॉलिवूड अभिनेता अभय देओल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतो. मात्र आता अभय त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. गोव्यातील आसगावात त्याने एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्याबाबत तो व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना सांगताना दिसत आहे. अभयने गोव्यात निसर्गाच्या सानिध्यात एक काचेचे आलिशान घर बांधले आहे. याविषयी 'व्हेअर द हार्ट इज'च्या एका एपिसोडमध्ये तो सांगताना दिसतोय.

सैर आलिशान घराची

दरम्यान, 'व्हेअर द हार्ट इज' या युट्यूब सीरीजमधून सेलिब्रिटी आपल्या घराची सैर घडवतात. अभय त्याच्या चाहत्यांना त्याच्या घराबद्दल आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींबद्दल सांगताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. अभयने व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्या गोव्यातील (Goa) आलिशान घराची सैर घडवली. त्याने सांगितले की, त्याने त्याच्या आर्किटेक्टला सांगितले होते की, त्याला घरात खिडक्या वापरायच्या नाहीत, त्याला घरात फक्त काचेचे स्लाइडिंग दरवाजे हवे आहेत. असा फिल आला पाहिजे की घराला निसर्गाने वेढलेले आहे.

अभयचं गोव्यातील मोहिनी घालणारं घर

अभयच्या आलिशान घरात एक मोठी लिविंग रुम आहे. इथे बसून तुम्हाला सहज समोरील बागेचे आणि मागे असलेल्या निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. घरात एक स्विमिंग पूल देखील आहे, जो अतिशय सुंदरपणे डिझाइन केला आहे. अभयने घरासाठी निवडलेल्या फर्निचरबद्दलही सांगितले. नंतर अभयने व्हिडिओमध्ये चाहत्यांना घरातील स्वयंपाकघर दाखवत सांगितले की, त्याला येथे त्याच्या मित्रांसाठी स्वयंपाक करायला खूप मजा येते. तो व्हिडिओमध्ये पुढे म्हणाला की, तो प्रॉपर्टी पाहताच तिच्या प्रेमात पडला आणि त्याचा शोध तिथेच संपला.

अभय 'या' चित्रपटात दिसला

अभय देओल 2000 च्या दशकाच्या मध्यात अनेक चित्रपटांमध्ये दिसला, ज्यामध्ये तो 'देव डी' आणि 'ओये लकी लकी ओये' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. यासोबतच त्याने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'आयशा' सारखे सुपरहिट चित्रपटही केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com