Goa Politics: 'आप'ला लक्ष्य करण्यासाठीच 'ईडी'चे छापे, भाजपाकडून पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न; वाल्मिकी नाईक यांची टीका

Goa AAP Press Meet: आम आदमी पक्षाचे गोवा सहप्रभारी दीपक सिंगला यांच्याशी संबंधित ठिकाणी गोव्यात 'ईडी'ने छापे टाकले.
Goa AAP Press Meet
Goa AAP Press MeetDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा सहप्रभारी दीपक सिंगला यांच्याशी संबंधित ठिकाणी गोव्यात 'ईडी'ने छापे टाकले. त्याचबरोबर त्यांना अटकही केली गेली आहे. हा सर्व प्रकार धमकावण्याचा व डावपेचांद्वारे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला.पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते.जनतेशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना देतात त्रास.

■ वाल्मिकी नाईक म्हणाले

जे नेते जनतेशी एकनिष्ठ राहतात आणि भाजपसमोर झुकण्यास नकार देतात, त्यांना अटक, छापे आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत.भाजपमध्ये सामील होण्यास नकार दिल्यानंतर पंजाबचे राज्यमंत्री संजीव अरोरा यांना अटक करण्यात आली, तर गोव्याचे सहप्रभारी दीपक सिंगला यांना आता दिल्ली आणि गोव्यात नियोजित छाप्यांनंतर अटक करण्यात आली आहे.

Goa AAP Press Meet
Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, कार्यकारी अध्यक्ष गेर्सन गोम्स, संघटन सचिव प्रशांत नाईक आणि उपाध्यक्ष सुनील सिंग्नापूरकर यांची उपस्थिती होती. संदेश तेलेकर देसाई म्हणाले की, गोव्यात आम आदमी पक्ष झपाट्याने लोकप्रिय होत असून भाजपला मजबूत राजकीय आव्हान देत आहे, हे भाजपला लक्षात आले आहे आणि म्हणूनच 'आप' नेत्यांविरोधात यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संघटन सचिव म्हणाले की, फोंडा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान भाजपला स्पष्टपणे जाणवले की 'आप' त्यांना तोडीस तोड लढत देत आहे, त्यामुळेच पक्षाच्या नेत्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com