

पणजी: फोंडा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच पोटनिवडणूक रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाशी संगनमत करून रचलेला भाजप सरकारचा एक जाणीवपूर्वक कट उघडकीस आल्याची टीका ‘आप’ने केली आहे.
आपच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी, फोंडा उमेदवार गीतेश नाईक, महिला आघाडीच्या अध्यक्षा ममता माबेन आणि नेते गौतम नाईक यांची उपस्थिती होती.
याचिकाकर्त्याच्या अपूर्व दळवी आणि भाजप यांच्यातील संबंधांवरही या नेत्यांनी प्रकाश टाकला. नाईक म्हणाले, की दिवंगत रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा पोटनिवडणूक घेणे आवश्यक बनले होते; परंतु ही निवडणूक रद्द होण्यामागे भाजपच्या अंतर्गत राजकारणानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
उमेदवार गीतेश नाईक म्हणाले की, प्रचारात पक्षाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपमध्येच अपूर्व दळवी यांना उमेदवारी (तिकीट) मिळवून देण्याचे प्रयत्न झाले होते; परंतु जनतेचा रोष ओढवेल या भीतीपोटी ती रितेश नाईक यांना द्यावी लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.