भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

Goa Road Issue: आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर आहेत.
Goa bad roads AAP letters
Goa bad roads AAP lettersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या परिस्थितीवरून भाजप सरकारला घेरलं आहे. केजरीवाल यांनी राज्य सरकारकचं लक्ष वेधून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्देशून स्थानिक रहिवाशांच्या एक लाख स्वाक्षरी असलेली पत्रं पाठवली आहेत. आम आदमी पक्षाने या मोहीमेअंतर्गत राज्यातील ३.५ लाख कुटुंबांपैकी १ लाख कुटुंबांच्या सह्या गोळा केल्या आहेत.

केजरीवाल यांनी सांगितले की, "भाजप सरकारच्या काळात रस्त्यांची स्थिती खालावली असून त्याचा थेट परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. आमचा उद्देश फक्त निषेध नोंदवणे नाही, तर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी दबाव तयार करणे आहे."

"ही मोहीम नागरिकांच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधणे आणि तातडीने कारवाईची मागणी करणे यासाठी राबवण्यात आली आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राज्यातील रस्त्यांच्या खराब स्थितीबाबत एक लाख रहिवाशांच्या स्वाक्षरी असलेले पत्र पाठवली आहेत. ही पत्र थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पाठवण्यात आली आहेत.

केजरीवाल म्हणाले, "आम्ही फक्त निषेध नोंदवत नाही, तर राज्यातील नागरिकांची समस्या आणि तातडीची कारवाईची मागणी मांडत आहोत. मला आशा आहे की मुख्यमंत्री प्रमोद सावंत याकडे लक्ष देतील."

गोव्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असल्याचं नागरिकांनी वारंवार सांगितलं आहे. भरधाव वाहतूक, मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान आणि दुरुस्तीची कमी ही प्रमुख समस्या राहिली आहे. मी ते स्वतः अनुभवले आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Goa bad roads AAP letters
Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

आप पक्षाचे नेते म्हणाले की, ही स्वाक्षरी मोहीम फक्त एक तातडीची कारवाईसाठी आहे आणि त्यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की रस्त्यांची दुरुस्ती तातडीने केली जावी. यावेळी पक्षाचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते, ज्यांनी रहिवाशांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. सरकारकडून या मोहीमेकडे कितपत गंभीरतेने पाहिले जाईल, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com