आपचे राहुल म्हांबरे यांची मायणा कुडतरी पोलीस स्थानकावर हजेरी

आपच्या (AAP) उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima coutinho) यांनाही आज पोलीस स्थानकावर बोलविण्यात आले होते मात्र, जारी केलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करीत त्यांनी पोलीस स्थानकावर टाळले.
Rahul mhambrey
Rahul mhambreyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नुवे केकवॉरमुळे सध्या चर्चेत असलेले आपचे गोवा (Goa) राज्य निमंत्रक राहुल म्हांबरेयांनी (Rahul mhambrey) आज मायणा कुडतरी पोलीस स्थानकावर हजेरी लावली. मी काही कुणाचा खून केला नाही किंवा दरोडाही घातलेला नाही तरीही मला पोलिसांनी नोटीस पाठवून येथे का बोलावले ते मला कळत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (AAP Rahul Mhambare's presence at Maina Curtorim Police Station)

काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेलेले नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा याना केक घेऊन गेलेल्या आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो व अन्य 100 कार्यकर्त्याविरुद्ध कोविड काळात संचारबंदीचा भंग केल्याचा आरोप ठेवला आहे. याच अनुषंगाने महाम्बरे याना पोलीस स्थानकावर बोलावून घेतले होते. या स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायगणकर यांनी त्यांची जाबानी नोंदवून घेतली. नुवे आमदाराच्या घरी गेलो असता जो हंगामा झाला त्याला आप कार्यकर्ते जबाबदार नसून डिसा यांचे समर्थक जबाबदार असल्याचे यावेळी महाम्बरे यांनी पोलिसांना सांगितले.

Rahul mhambrey
Goa Politics : महिला कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणणार

त्या नंतर पत्रकारांशी बोलताना महाम्बरे यांनी आम्ही डिसा यांच्या घरी बॉम्ब घेऊन गेलो नव्हतो तर केक घेऊन गेलो होतो. प्रमोद सावंत यांच्या सरकारात कुणाला केक घेऊन जाणेही गुन्हा होतो का असा सवाल त्यांनी केला.

मी पोलिसांना दोष देत नाही. कारण ते फक्त हुकमाचे ताबेदार आहेत. पोलिसांचा वापर करून विरिधकांचा आवाज बंद करणे ही आता प्रमोद सावंत सरकारची कार्यपध्दती झाली आहे अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो यांनाही आज पोलीस स्थानकावर बोलविण्यात आले होते. पण आपल्याला जारी केलेली नोटीसच बेकायदेशीर असल्याचा दावा करीत त्यांनी पोलीस स्थानकावर टाळले. काल त्यांनी ही नोटीस स्वीकारण्यासही नकार दिला होता. पोलीस स्थानकावर जाण्याऐवजी मी माझ्या नावेली मतदारसंघात लोकांना रेशन वाटण्यास अधिक महत्व दिले असे कुतीन्हो यांनी नंतर सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com