दिल्लीतील कथित दारू घोटाळाप्रकरणी तपास यंत्रणेने गोळा केलेले सर्व साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे विचारात घेतल्यानंतरही, ते पुरावे त्या प्रकरणातील सत्य असल्याचे सिद्ध करण्याकरिता पुरेसे नसल्याचे निरीक्षण दिल्लीच्या न्यायालयाने जामीन अर्जाच्या आदेशात नोंदविली आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बदनाम करण्याचे कुभांड रचल्याची टीका आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली.
येथील आप कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार व्हेन्झी व्हिएगस यांची उपस्थिती होती. बोगस दारू घोटाळा भाजपच्या कार्यालयात रचण्यात आला. भाजपच्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी सीबीआय आणि ईडीला जबरदस्तीने पुरावे तयार करण्याचे काम दिले गेले होते, हे आता न्यायालयाच्या निष्कर्षावरून स्पष्ट होते, असा टोला नाईक यांनी यावेळी लगावला.
नाईक म्हणाले, अबकारी धोरण प्रकरणावरून भाजप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने बदनामी भाजपने केली आहे, त्याबद्दल आता भाजपच्या प्रवक्त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोणतेही विशिष्ट पुरावे नसताना आणि साक्षीदाराच्या अस्पष्ट विधानाच्या आधारावर भाजपने कसे नाटक रचले याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपने दहा हजार, एक हजार आणि 100 कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. घोटाळ्यातील पैसा आपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, दोन्ही आरोप अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सिद्ध करू शकले नाही.
आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, सध्या ''आप'' हा एकमेव असा पक्ष आहे, जो भाजपच्या फुटिरतावादी डावपेचांचा मुकाबला करत आहे. त्यामुळेच भाजप ''आप''ला बदनाम करण्याच्या तयारीत आहे. कारण त्यांना विरोधक नको आहेत.
ध्वनी प्रदूषणाची परवानगी
सार्वजिनिकरित्या प्रयोग होणाऱ्या तियात्र नाटकांसाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आणावी लागते. त्यासाठी दक्षिण गोव्यातून साळगाव येथे परवानगी आणण्याकरिता हेलपाटे घालावे लागतात.
तियात्र किंवा नाटकांच्या सादरीकरणाचे आवाज 200 मीटरच्याही बाहेर जात नाहीत. नाटक किंवा तियात्र हे आवाजाची मर्यादा ओलांडत नाहीत, असे असतानाही त्यांना प्रदूषण मंडळाचा दाखला कशासाठी लागू करता, असा सवाल आमदार व्हेन्झी यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.