Jerson Gomes Attack: जर्सन गोम्सवरील हल्ल्यानं कुंकळ्ळीत राजकीय वातावरण तापलं! आरोपीच्या तात्काळ अटकेसाठी 'आप' नेत्यांचं पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

Jerson Gomes Attack Latest News: सरपंच गोम्स यांच्यावर कार्यालयातच घुसून हल्ला केल्याचा आरोप माल्कम परेरा याच्यावर आहे.
Jerson Gomes Attack Latest News
Jerson Gomes AttackDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: चिंचोणे पंचायत कार्यालयात सरपंच जर्सन गोम्स यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी कुंकळ्ळी पोलिस ठाणे आणि संबंधित पंचायत कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.

सरपंच गोम्स यांच्यावर कार्यालयातच घुसून हल्ला केल्याचा आरोप माल्कम परेरा याच्यावर आहे. संशयित परेराला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ‘आप’च्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आपचे प्रदेश अध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि इतर नेत्यांचा समावेश होता.

Jerson Gomes Attack Latest News
Goa Politics: गोव्यात राजकीय बदलासाठी नवी समीकरणं! सरदेसाईंची घोषणा; 'गोवा फर्स्ट' तिसरी नव्हे, पहिल्या क्रमांकाची आघाडी

दरम्यान, कुंकळ्ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माल्कम याच्या विरोधात पोलिसांनी पोलिस ठाण्यात चौकशीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. ज्या इस्पितळात परेरा यांनी स्वतःला दाखल करून घेतले होते, तिथे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण : सरदेसाई

सरदेसाई म्हणाले, माल्कम हा सराईत गुन्हेगार असून, सोशल मीडियावरून दुसऱ्यांची बदनामी करणे हे त्याच्यासाठी नित्याचे बनले आहे. यापूर्वी एसजीपीडीए मार्केटच्या सोपो वसुलीचे कंत्राट मिळालेल्या या माल्कमने वसूल केलेले पैसे एसजीपीडीएत न भरल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती, याकडे लक्ष वेधले.

Jerson Gomes Attack Latest News
Goa Panchayat: सरपंचांच्या एकहाती 'सील' कारवाईला लगाम! पंचायतींसाठी सरकारची नवी कार्यपद्धती; आता ठरावाशिवाय करता येणार नाही कारवाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com