AAP Exit INDIA Block: मोठी बातमी! गोव्यात आम आदमी पक्षाचा इंडिया आघाडीला राम राम; 'एकला चलो रे'चा नारा

Goa Politics: गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्षानं (AAP) इंडिया आघाडीतून (INDIA Alliance) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
AAP Exit INDIA Block
AAP Exit INDIA BlockDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. आम आदमी पक्षानं (AAP) इंडिया आघाडीतून (INDIA Alliance) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

गोव्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे विरोधकांमध्ये आधीच असलेल्या मतभेदांना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स आदी पक्षांमध्ये आधीपासूनच समन्वयाचा अभाव दिसून येत होता.

आता आपच्या या पावल्यानं इंडिया आघाडीच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती.

AAP Exit INDIA Block
Goa History: 'राजगो'ला देहांताची शिक्षा फर्मावली, त्याने म्हादईच्या डोहात आंघोळ केली, शिक्षेसाठी तयार झाला; वंदनीय महापुरुष

गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा उपस्थित होते.

मात्र, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी बैठकीला पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपच्या राज्य समन्वयक अमित पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

AAP Exit INDIA Block
Goa University: गोवा विद्यापीठाला NAAC कडून A+ ग्रेड! इतिहासात पहिल्यांदाच मिळाला हा मान, CM सावंतांनी केलं अभिनंदन

सध्या आपच्या या निर्णयावर इंडिया आघाडीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधकांच्या एकतेसाठी आणि आगामी राजकीय समीकरणांसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com