Goa AAP: हा सर्व प्रकार घोटाळाच! भाजपने 'मनुष्यबळा’तील नोकऱ्यांत आपल्‍या मंत्री, आमदारांनाच अर्ज दिल्याचा आरोप

Amit Palekar: राज्य मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वतीने विविध पदांसाठी दिलेले अर्ज सरकारने मंत्री व आमदारांना वाटल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी केला
Amit Palekar: राज्य मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वतीने विविध पदांसाठी दिलेले अर्ज सरकारने मंत्री व आमदारांना वाटल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी केला
Amit PalekarCanva
Published on
Updated on

AAP Amit Palekar About Recruitment In State Manpower Development Corporation

पणजी: गोवा राज्य मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वतीने विविध पदांसाठी ९४४ जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी महामंडळाने विहित नमुन्यातील अर्जाची किंमत ५० रुपये ठेवली आहे. या अर्जातील एक ते सहा हजार क्रमांकाचे अर्ज सरकारने मंत्री व आमदारांना वाटल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी केला.

हा प्रकार म्‍हणजे घोटाळाच

एका अर्जासाठी महामंडळ ५० रुपये रोख रक्कम स्वीकारत आहे. डिजिटल पेमेंट घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश डिजिटलायझेशन केल्याचे सांगतात. कोणाकडे पैसे नसल्यास त्यांना एटीएम गाठावे लागते. अर्ज खरेदी केल्यानंतर त्याची पावती दिली जात नाही. अर्जांचे नंबरही जुळत नाहीत. महामंडळात व्यवस्थापकीय संचालक नाहीत. हा सर्व प्रकार घोटाळाच आहे, असे अमित पालेकर म्‍हणाले.

Amit Palekar: राज्य मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वतीने विविध पदांसाठी दिलेले अर्ज सरकारने मंत्री व आमदारांना वाटल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अमित पालेकर यांनी केला
गोव्यातील युवक हताश! एकीकडे दुप्पट Unemployment Rate तर दुसरीकडे पैसे घेऊनच नोकरी; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

अमित पालेकर, ‘आप’चे राज्य संयोजक

अर्ज नेण्यासाठी आलेला एक ३० वर्षीय युवक मला भेटला. गेल्‍या आठ वर्षांपासून तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. आता शेवटचा पर्याय म्हणून तो अर्ज नेत आहे, तोही सुरक्षारक्षकाचा. पदवीधर असलेले युवक जर सुरक्षारक्षक पदासाठी अर्ज घेऊन जात असतील तर ते दुर्दैवच म्‍हणावे लागेल. या युवकांची सरकारने आत्तापर्यंत नोकऱ्यांचे आमिष दाखवून थट्टाच केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com