Goa AAP: म्हापशात सत्ताधाऱ्यांविरुद्ध आपचा आक्रोश

Goa AAP Protest At Mapusa: कचरा व्यवस्थापन तसेच खड्डेमय रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत आम आदमी पक्षातर्फे म्हापशात निर्दशने
Goa AAP Protest At Mapusa: कचरा व्यवस्थापन तसेच खड्डेमय रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत  आम आदमी पक्षातर्फे म्हापशात निर्दशने
Goa AAP Protest At MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

येथील शहरातील कोलमडलेले कचरा व्यवस्थापन तसेच खड्डेमय रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत आज शुक्रवारी आम आदमी पक्षातर्फे म्हापशात निर्दशने करण्यात आली. येथील मार्केटच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारीविरुद्ध हा आक्रोश व्यक्त केला.

पालिका व सरकारला स्वच्छतेबाबत तसेच लोकांच्या आरोग्याविषयी गांभीर्यता नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. आपच्या कार्यकर्त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भाजपाच्या चिन्हाचे झेंडे लावत, सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या.

आपचे सलमान खान म्हणाले, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे म्हापसा शहर हे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. कचऱ्याचे संकलन व व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने शहरातील प्रवेशद्वार असो किंवा इतरत्र उघड्यावर कचरा फेकला जातोय. परिणामी, श्वान किंवा उंदिर यावर रेंगाळतात. यातूनच लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. तसेच डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळते.

Goa AAP Protest At Mapusa: कचरा व्यवस्थापन तसेच खड्डेमय रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत  आम आदमी पक्षातर्फे म्हापशात निर्दशने
Goa AAP: भर पावसात दरड कोसळलेल्या ठिकाणी ‘आप’ची सरकारविरोधी घोषणाबाजी

शहराची वाताहत!

चेतन कामत म्हणाले, मागील वीस वर्षे म्हापसा शहरात भाजपाचीच सत्ता आहे. परंतु आवश्यक बदल शहरात झालेला नाही. पूर्वी वडिल व आता मुलगा म्हापशाचे प्रतिनिधीत्व करतोय, परंतु येथील शहराची पूर्ता वाताहत झाली आहे. एक टॅक्सीकार या नात्याने जेव्हा पर्यटकांना शहर दाखविण्यासाठी आम्ही येतो, तेव्हा शहराची विदारक व अनियोजित विकास पर्यटकांच्या नजरेस दृष्टीस पडतो. याठिकाणी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसते, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com