Goa Loksabha: आपची लोकसभा निवडणुकीतून माघार? दक्षिण गोव्यात काँग्रेसचाच उमेदवार

Goa Loksabha 2024: दिल्लीत झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षात सामंजस्य झाल्याची माहिती समोर आली आहे.
MLA Venzi Viegas
MLA Venzi ViegasDainik Gomantak

Goa Loksabha 2024

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातून उमेदवाराची घोषणा केली. आप इंडिया आघाडीचा भाग असल्याने जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वी त्यांनी उमेदवाराची घोषणा केल्याने काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, याप्रकरणी आज (दि.22) दिल्लीत झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षात सामंजस्य झाल्याची माहिती समोर असून, आम आदमी पक्ष गोव्यातून उमेदवारी मागे घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातून लोकसभेसाठी बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांच्या नावाची घोषणा केली. गोव्यातील दोन्ही जागेवर काँग्रेसने दावा केल्यानंतर आपने अचनाक केलेल्या घोषणेमुळे इंडिया आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

जाहीर केलेला उमेदवार इंडिया आघाडीचाच असल्याचा दावा आपने केल्याने काँग्रेस काहीशी आक्रमक झाल्याचे दिसून आले. दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विद्यमान खासदार असल्याने काँग्रेस या जागेसाठी आग्रही होती.

MLA Venzi Viegas
Cardinal Filipe Neri Ferro: गोवा-दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांची आशियाई चर्चच्या अध्यक्षपदी निवड

याबाबत आज (गुरुवारी) दिल्लीत झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या दोन्ही पक्षात सामंजस्य झाल्याची माहिती समोर आली असून, आप लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दक्षिण गोव्यात आता काँग्रेसचाच उमेदवार असेल याबाबत जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, आपचे गोवा संयोजक अमित पालेकर सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com