Mapusa Market: म्हापसा मार्केटला ‘चोर बाजार’ असे संबोधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मार्केटची बदनामी केल्याबद्दल व्हिडिओ टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. यासंदर्भात व्हिडिओ बनविणाऱ्या युवकाला सोमवारी (ता.११) म्हापसा पोलिसांनी चौकशीला बोलविले होते.
संपूर्ण प्रकरण असे की, साधारण दोन महिन्यांपूर्वी कळंगुटमधील अशोक भाटी (२२) या युवकाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हापसा मार्केटबद्दल आक्षेपार्ह माहिती पसरवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो हे मार्केट गोव्याचा ‘चोर बाजार’ असल्याचे सांगत होता.
तो व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ प्रकाशित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत आणि सचिव सिद्धेश राऊत यांनी म्हापसा पोलिसांना केली.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी अशोक भाटी याला पोलिसांनी चौकशीला बोलावले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. अनावधानाने आपण हा व्हिडिओ बनवला असून, पुन्हा अशी चूक करणार नसल्याचे अशोक भाटी याने सर्वांसमोर हात जोडून मान्य केले.
तसेच तो व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून डिलिट करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला समज देत पुन्हा असे कोणतेच कृत्य न करण्याची ताकीद देऊन सोडून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.