Curchorem: कुडचडे ते काकोडा रस्त्यात ट्रक रूतला; वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

वाहनधारकांना मनस्ताप
Goa Traffic
Goa TrafficDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic: पणजी शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीची कामे आणि अंतर्गत पाईपलाईनची पावसाळ्यापुर्वीची कामे यामुळे सर्वत्र खोदकाम केल्याचे दिसते. त्यातच अनेकदा शहरात ट्रक रूतल्याचेही समोर आले होते. ट्रक रूतण्याच्या अशा घटना इतरही ठिकाणी घडत असल्याचे समोर येत आहे.

बुधवारी सकाळी दक्षिण गोव्यातील कुडचडे येथे रस्त्यात ट्रक रूतला. कुडचडे कडून काकोडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाणाऱ्या हा प्रकार घडला. या रस्त्यावर सिवरेजचे काम चालू आहे. त्यामुळे तिथे आधीचपासून खोदकाम करण्यात आले आहे.

या रस्त्यातील अशाच एका खड्ड्यात हा ट्रक अडकला. खूप प्रयत्नांनंतरही हा ट्रक अद्याप बाहेर निघलेला नाही.

Goa Traffic
Forest Fire in Goa: गोव्याचे जलच्रक बिघडणार? जंगलांना लागलेल्या आगीमुळे 'हे' दुष्परिणाम होण्याची भीती...

तथापि, ट्रक अडकल्याने या ट्रकच्या मागे वाहनांची मोठी रांग लागली आहे. अनेक वाहनधारकांचा मोठा खोळंबा त्यामुळे झाला आहे. दुपारी साडेबारा पर्यंत तरी हा ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला नव्हता. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप झाला. अनेक लोकांना विनाकारण इथेच अडकून पडावे लागले.

दरम्यान, ही समस्या रोजची असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दररोज दिवस रात्र या सिवरेजच्या कामाचा त्रास होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. खड्डे खोदलेल्या जागी माती पातळ असल्याने गाड्यांची चाके येथे रूततात. त्यात अवजड वाहन असले तर ते अडकून बसते.

येथून वाहतूक करणेच धोकादायक बनले आहे. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com