कुठ्ठाळी मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात, शिवसेना इतिहास घडवणार?

एकापेक्षा एक बलाढ्य उमेदवार कुठ्ठाळीतून निवडणूक आखाड्यात उतरलेत
Goa Shiv Sena
Goa Shiv SenaDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेनेच्या कुठ्ठाळी मतदार संघातील उमेदवार भक्ती खडपकर तसेच वास्को मतदार संघातील उमेदवार मारुती शिरगावकर यांनी घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे. त्यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन्ही उमेदवारांनी आपण 100 टक्के विजयी होणार असा दावा केला आहे. कुठ्ठाळी मतदार संघातून एकूण 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

पैकी माजी आमदार एलिना साल्ढाणा (आप) आणि भक्ती खडपकर (शिवसेना) या दोन महिला उमेदवार आहेत. खडपकर ह्या कुठ्ठाळीतून शिवसेनेच्या उमेदवार असतील असे निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले होते. तर वास्को मतदारसंघातून युवा शिवसैनिक कार्यकर्ते मारुती शिरगावकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्याच्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Goa Shiv Sena
गोव्यात आप 'या' 60% मतांना मुकणार, जातीय समीकरण अंगलट?

त्यानूसार अधिकृतरित्या खडपकर यांना शिवसेनेने (Shiv Sena) कुठ्ठाळीतून रिंगणात उतरवले आहे. तर वास्कोतून शिरगावकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. समाजसेवी वृत्ती बाळगून खडपकर व शिरगावकर हे दोन्ही उमेदवार आपले कार्य मुरगाव (Mormugao) तालुक्यातील विविध भागात चालवतात. महिलांच्या सशक्तीकरणासाठी खडपकर विशेष लक्ष देऊन कार्य करतात. तसेच शिरगावकर लोकांचे विविध प्रश्न हाताळून समाज कार्य करत आहेत. त्यांच्या एकूण कार्यपद्धतीची शिवसेनेने दखल घेऊन खडपकर यांना कुठ्ठाळीतून तर शिरगावकर यांना वास्कोतून उमेदवारी दिली आहे.

एकापेक्षा एक बलाढ्य उमेदवार कुठ्ठाळीतून निवडणूक (Election) आखाड्यात उतरलेले असतानाही खडपकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. कुठ्ठाळीतील जनतेसाठी आपण काय करू शकते ते खडपकर मतदारांना पटवून सांगतात. त्यांच्या प्रचारात महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत. तसेच वास्कोतून शिरगावकर यांनी बलाढ्य उमेदवारांना आव्हान दिले आहे.

Goa Shiv Sena
पर्रीकरांनी तिकीट वाटपात वापरले होते 'हे' कौशल्य, 'असा' झाला होता फायदा

कुठ्ठाळीतील तसेच वास्कोतील (Vasco) जनतेला बदल हवाय, त्यासाठी मतदारांनी मला पसंती देण्याचा निर्णय घेतला आहे असे खडपकर व शिरगावकर यांचे म्हणणे आहे. कुठ्ठाळीत वास्कोत शिवसेना इतिहास घडवेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षाकडे युती असल्याने त्यांचेही कार्यकर्ते खडपकर व शिरगावकर यांचा प्रचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com