Goa Education News: 30 प्राध्यापकांची टीम म्हैसूरला रवाना..! इन्फोसिस स्प्रिंगबोर्डकडून मिळणार नेतृत्वाचे धडे

Goa Education News: शिक्षण खात्याचा पुढाकार
Education News
Education News Dainik Gomantak

Goa Education News: उच्च शिक्षण संचालनालय, राज्य उच्च शिक्षण परिषद, गोवा सरकार व इन्फोसिस स्प्रिंगबोर्डच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसीय शैक्षणिक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

या कार्यक्रमातून शैक्षणिक नेतृत्व विकसित करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान इन्फोसिस म्हैसूर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये होणार आहे.

या प्रशिक्षणासाठी राज्यातील ३० शिक्षकांची टीम सोमवारी सायंकाळी पाच वाजता पर्वरी येथून म्हैसूरला रवाना झाली.

यावेळी राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, प्रो. विठ्ठल तिळवी, प्रो. नियॉन मार्शेन आदी मान्यवर उपस्थित होते.

हा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे गोव्यातील उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राध्यापकांची गुणवत्ता आणि क्षमता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा भाग आहे.

या सर्व प्राध्यापकांना पुढील सहा महिन्यांत दुसऱ्या संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. राज्यात प्राचार्य पदासाठी कार्यतत्पर उमेदवार मिळत नाहीत. ते तयार व्हावेत हा देखील या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे.

Education News
IFFI Goa 2013: ‘इफ्‍फी’ 2047 पर्यंत जागतिक महोत्‍सव

अशी आहेत या कार्यक्रमांची उद्दिष्टे

शिक्षकांमध्ये दूरदर्शी नेतृत्व गुण विकसित करणे

शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी धोरणात्मक अंतर्दृष्टी प्रदान करणे

शिक्षकांना आधुनिक नेतृत्व तंत्र आणि पद्धतींनी सुसज्ज करणे

नेतृत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी शिक्षकांना तयार करणे

शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्‍त उपक्रम : मुख्यमंत्री

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या सहकार्याने उच्च शिक्षण संचालनालय, आणि गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद

हा तीन दिवसीय शैक्षणिक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करत आहे, याचा मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तसेच शिक्षणाच्या प्रगतीसाठी, शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या तील नेतृत्व गुण वाढीस लागण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com