मोडी लिपीच्या वळणांचा मागोवा

शंभर वर्षांआधीची “जुनी मोडी लिपीत असलेली दप्तर देवनागरीत रूपांतर करणे” असा ठराव मंजूर झाला आहे.
Modi Lipi
Modi LipiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोवा: अडवट सिंहासनाधीश्वर महापती श्री मल्लिकार्जुन देव’ हे काणकोण महालाचे आद्यदैवत. श्री मल्लिकार्जुन देवस्थान आणि संलग्न दैवते ही पुर्वापार असल्याने त्यांची स्थापना कधी व कुणी केली याचा लिखित इतिहास (History) उपलब्ध नाही. तरीही इथवर प्रचलित काही दंतकथा, लोककथा, आख्यायिका सांगतात की श्रींचा शोध वेळीप (Velip) समाजातील एका शेतकऱ्याला शेती लागवडीसाठी जमीन साफ करत असताना लागला. लिखित इतिहासाचा परामर्श घ्यायचा झाल्यास, या देवस्थानाचा जीर्णोद्धार शालिवाहन शके 1778 साली झाल्याचे नमूद झालेले आहे.

Modi Lipi
पर्रीकरांनी तिकीट वाटपात वापरले होते 'हे' कौशल्य, 'असा' झाला होता फायदा

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या देवस्थानाचे कार्यालयीन व व्यवहारीक कार्यवहन महाजन मंडळींनी अत्यंत प्रामाणिकपणे, इमाने – इतबारे केलेले आहे. याचा प्रत्यय, देवस्थान कचेरीतील नीट – नेटका हिशोब, चोख दप्तर, वह्या आदी पाहिल्यास येतो. इ.स.1866 मध्ये तत्कालीन पोर्तुगीज (Portuguese) सरकाराने महाजनीय देवालयांची पहिली नियमावली (Code) जाहीर केली. इ.स.1889 मधल्या एका सरकारी आदेशामुळे देवस्थानातील दाग-दागिने, कपडालत्ता, जमीन–जुमला, भांडी-कुंडी, अवजारें, उत्पन्नाची साधने, सीमा निर्देश, महाजनांची नामावली, देणगीदारांची नावे, संलग्न दैवतांची स्थाने, दैनंदिन पुजा–अर्चा, नैवेद्य आदी कार्यक्रमाची रूपरेखा, तसेच महाजन आणि सेवेकऱ्यांची कर्तव्ये व अधिकार त्यांच्या बिदागी अशा विषयांची सविस्तर माहिती लिहून ‘कॉम्प्रोमेस’ (Compromises) तयार झाला आणि त्या वह्या सरकार दरबारी सादर झाल्या.

पुढे जवळपास शंभर वर्षांनंतर म्हणजे दिनांक 21 ऑक्टॉबर 1973 या दिवशी देवालयीन समितीच्या बैठकीत “जुनी मोडीत असलेले दप्तर देवनागरीत रूपांतर करणे” असा ठराव मंजूर झाला. देवालयीन कामकाजाच्या आद्य मोडी लिपीतील (Modi Lipi) दस्तऐवजांचा कामाला सुरूवात करण्यात आली.

देवस्थानांच्या या हिशोब वह्यांतून देवस्थान विषयक जमीनजुमल्याची माहिती असलेल्या पुरातन वह्या दप्तरातून नाही होऊ शकतात; अशी भविष्य काळासंदर्भातली भीती देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई (Rajendra Desai) व यांच्या देवस्थान कार्यकारी समितीच्या सदस्यांना वाटली आणि सदर संदर्भात काही करता येण्याजोगे आहे का? असा प्रश्न श्री राजेंद्र देसाईंनी एका अनौपचारीक भेटीदरम्यान प्राचार्य प्रो. डॉ. मनोज कामत (Dr. Manoj Kamat) यांच्यासमोर उपस्थित केला.

Modi Lipi
पर्रीकरांनी तिकीट वाटपात वापरले होते 'हे' कौशल्य, 'असा' झाला होता फायदा

कोणत्याही कारणास्तव देवस्थान दप्तरातील कागदपत्रे नष्ट होणे ही बाब दुर्दैवी असू शकते. देवालयीन पुरातन कागदपत्रे म्हणजे एका प्रकारचा सांस्कृतिक ठेवा, धर्मसंस्था निती-नियमानुसार अग्रेसर ठेवण्याचे ते एक उपयुक्त असे साधन, आद्य लिखित परंपरेची ग्वाही देणारा तो एक भाषाशास्त्रीय ऐवज, आद्यकालीन समाज – सांस्कृतिक आणि आर्थिक बांधणी समजण्यासाठी उपयुक्त असा सजीवावशेष, लोकसाहित्य, समाजशास्त्र, दैवतशास्त्र, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र अशा विद्याशाखांची शोधन सामग्री. या प्रतीत वापरली गेलेली भाषा, मोडी लिपीचे वळण, तत्कालीन लिखित व्यवहारातील मराठी भाषा या अत्यंत संशोधनपर पुरातत्त्वीय अधिष्ठान प्राप्त सामग्रीची प्रकर्षाने जाणिव होताच छापिल, मुद्रित स्वरूपाचे टंकलेखन न करता, हस्तलिखिताचीच मुळ स्वरूपात अभ्यासकांच्या, वाचकांच्या हातात देणे योग्य ठरले असते.

रेस्टोरेशन, स्टोरेज, डिजिटायझेशन या प्रक्रियेद्वारे सदर दस्तऐवज आपल्या मूळ, स्थायी स्वरुपात भावी पिढीस उपलब्ध व्हावा ह्या संवर्धनलक्षीय, प्रांजळ, प्रामाणिक हेतूने त्या कागदपत्रांचे डिजिटल स्कॅनिंग करून त्याच्या सिडी बनविण्याचे कार्य झाले व या दस्तऐवजाच्या सात नोटराईझ प्रती श्री मल्लिकार्जुनाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या.

देवस्थानाची सेवेकरी वापरत असलेली स्थावर मालमत्ता तसेच बिदागीच्या स्वरुपात सेवेकरी आणि इतरांना दिलेल्या जमीनजुमल्याची वर्तमानातील किंमत आज कोट्यावधींच्या घरात आहे. केवळ काणकोणातच नव्हे तर दक्षिणेकडील कारवार जिल्ह्यातील अवर्सापासून, उत्तरेकडच्या फोंडा महालापर्यंत जमीनजुमला विविध ठिकाणी विखुरलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.