Monsoon Assembly Session: अधिवेशनासाठी 18 दिवसांचा कालावधी पुरेसा; संभापतींची माहिती

नियोजन केल्यास विरोधकांना अधिकाधिक प्रश्न मांडण्याची संधी
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी हा २० दिवसांचा होता. मात्र, अमावस्या आल्याने ते १८ दिवसांचे केले. ही अंधश्रद्धा कशासाठी? असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर सभापती रमेश तवडकर म्हणाले, की अधिवेशन अधिक दिवसांचे व्हावे, अनेक विषय चर्चेला यावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, परंतु १८ दिवसांचा अधिवेशनाचा कालावधीही कमी नाही. विरोधकांनी नियोजन केल्यास ते अधिक प्रश्न मांडू शकतील.

Ramesh Tawadkar
Calangute News: शिवपुतळ्यावरून तणाव; आक्रमक शिवप्रेमींपुढे कळंगुटचे सरपंच नमले

तवडकर यांनी ‘गोमन्तक टीव्ही’ वरील चर्चेत संपादक-संचालक राजू नायक यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले, विरोधकांनी योग्यरीत्या नियोजन केल्यास राज्याच्या हिताच्यादृष्टीने ते अधिवेशनात अनेक विषय मांडू शकतील. सभापती म्हणून काम करीत असताना आपल्यावर कुणाचाच दबाव राहिला नाही. आपण चारवेळा आमदार झालेलो आहे. त्यामुळे सभागृहात मी एक वरिष्ठ आमदार आहे.

भाजपाने सत्तेचा वापर करून अनेक आमदार फोडले. सत्ताधारी पक्षाचे आमदार जास्त असले तरी विरोधकांना अधिक वेळ द्यावा असे विरोधकांना वाटते. यावर सभापती म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे जास्त आमदार असले तरी विरोधी पक्षाच्या आमदारांना योग्य वेळ दिलेला आहे.

कायदे पडताळणी करून होतात...

भूरूपांतराच्या कायद्याबाबत जी टीका झाली, सरकारवर आरोप करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना तवडकर म्हणाले, की कायदे मंजूर करताना कोणा मंत्र्याला किंवा आमदाराला तो पाहिजे असतो म्हणून अमलात येत नाही. त्या कायद्याची पूर्णपणे पडताळणी होऊन कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कायदे केले जातात. त्यामुळे विरोधकांनी उगाच आरोप करणे योग्य नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com