Goa Crime News: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये रात्री आईला आली जाग, मुलीच्या बर्थवर....; मडगावमध्ये एकाला अटक

Goa Crime News: धावत्‍या रेल्‍वेत अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: रेल्‍वेतून केरळहून गोव्‍याला येत असताना एका अल्‍पवयीन मुलीचा धावत्‍या रेल्‍वेतच विनयभंग झाल्‍याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मडगावच्‍या कोकण रेल्‍वे पोलिसांनी एका 49 वर्षीय रेल्‍वेत चणे-फुटाणे विकणाऱ्याला अटक करून त्‍याला मुर्डेश्‍वर पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले आहे.

Goa Crime News
Lok Sabha Election: नरेश सावळ लोकसभा रिंगणात शक्य

ही घटना शनिवारी घडली. सदर मुलगी पालकांसोबत गोव्‍यात येत होती. रात्री तिला मधल्‍या बर्थवर झोपवून तिचे आई-वडील खालच्‍या बर्थवर झाेपले हाेते.

पहाटे तिच्‍या आईला जाग आली असता, मुलीच्‍या बर्थवर अनोळखी पुरुष झोपल्याचे पाहताच तिने ओरडून लोकांना जागे केले.

लोकांनी त्‍या विक्रेत्‍याला पकडून मडगाव येथे रेल्‍वे पोलिसांकडे दिले. दरम्‍यान, यापूर्वी असाच प्रकार पेडणेत धावत्‍या रेल्‍वेत घडला होता. तेही प्रकरण मडगावला नोंदवले होते,असे सामाजिक कार्यकर्त्या आवदा व्‍हिएगस यांनी सांगितले.

Goa Crime News
Goa Mining Case: थकीत वेतन वेळेत न दिल्यास खाण बंद पाडू

19 वर्षीय विद्यार्थिनीचा बस कंडक्टरने केला विनयभंग

गोव्यात बसमधून प्रवास करत असताना एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा बस कंडक्टर 20 वर्षांचा आहे.

संबंधित विद्यार्थिनी बसमध्ये चढली की ती उतरेपर्यंत हा कंडक्टर तिच्याकडे पाहत राहायचा. तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन त्याने केल्याचे सांगितले जात आहे.

या मुलीला शिक्षणासाठी याच बसने जावे लागायचे आणि या बसमध्ये संबंधित कंडक्टर गेल्या वर्षभरापासून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. वारंवारच्या त्रासाला संबंधित विद्यार्थिनी कंटाळली होती.

सोमवारी कंडक्टरने तिचा विनयभंग केल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार कंडक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com