Fire In Sanguem: सांगे येथील बंद फॅक्टरीला भीषण आग, फॅक्टरीतील लाकूड सामानासह जुन्या वस्तू जळून खाक

या आगीची तीव्रता एवढी होती कि, फॅक्टरीवरील पत्रे देखील आगीच्या दाहकतेमुळे फुटले
Fire In Sanguem
Fire In SanguemDainik Gomantak
Published on
Updated on
Fire In Sanguem
Fire In SanguemDainik Gomantak

सांगे येथील वरकटो भागातील एका बंद फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. कुडचरकर फॅक्टरी असे या कारखान्याचे नाव असून या फॅक्टरीत मॅगनीजवर प्रक्रिया करण्याचे काम चालत होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ही घटना आज संध्याकाळी 4 च्या सुमारास घडलीय. सुरुवातीला येथील स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले मात्र फॅक्टरी शेजारी सुके गवत, कचरा, काजूची झाडं, माड बागायती असल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. सदरचे वृत्त समजताच कुडचडे येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

Fire In Sanguem
Fire In SanguemDainik Gomantak

आगीत फॅक्टरीतील लाकूड सामान, जुन्या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीची तीव्रता एवढी होती कि, फॅक्टरीवरील पत्रे देखील आगीच्या दाहकतेमुळे फुटले. या फॅक्टरी शेजारी शाळा तसेच लोकवस्ती असल्याने आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर फार मोठा अनर्थ घडला असता.

Fire In Sanguem
Goa Congress : भाजपला सत्ताभ्रष्ट करा! - युरी आलेमाव

अद्यापही आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेलं नाहीय. धक्कादायक म्हणजे फॅक्टरी शेजारीच 11 हजार व्होल्टेजच्या विजेचा खांब होता. मात्र परिस्थितीचे भान राखत स्थानिकांनी या विजेच्या खांबानजीकच्या आग तातडीने विझवली.

कुडचडे येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आग विझवण्यासाठी तब्बल 2 बंब वापरण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. आगीत नेमके किती नुकसान झालेय याची माहिती मिळू शकली नाहीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com