विजेचा झटक्याने उत्तर प्रदेशच्या मजूराचा गोव्यात मृत्यू

तिखाजन-मये येथे एका स्मशानभूमीचे काम करीत असताना मयत सुनील माणिकचंद कुमार (वय 27) हा हातात कटर घेऊन पत्रा कापण्याचे काम करीत होता.
Pillar Of light
Pillar Of lightDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: तिखाजन-मये येथील एका स्मशानभूमीचे काम करताना एका उत्तर प्रदेश राज्यातील मजूराचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिखाजन-मये येथे एका स्मशानभूमीचे काम करीत असताना मयत सुनील माणिकचंद कुमार (वय 27) हा हातात कटर घेऊन पत्रा कापण्याचे काम करीत होता. (A labourer from Uttar Pradesh has died while working in a cemetery at Tikhajan-Maye)

Pillar Of light
Bicholim: पोलिस स्थानकातील गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

त्याचवेळी त्याला कटरचाच वीजेचा जबरदस्त झटका आला. त्याच परिस्थितीत त्याला डिचोली (Bicholim) सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती आरोग्य केंद्रातून डिचोली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रजित मांद्रेकर यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवून दिला. मयत सुनील कुमार यांचे भाऊ गोव्यातच कामानिमित्त असल्याने त्यांना या घटनेची कल्पना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com