Amona Bridge : आमोणे पुलावरून युवतीची नदीत उडी?

Amona Bridge : दिवसभराच्या शोधमोहिमेनंतरही थांगपत्ता लागला नाही
Amona Bridge
Amona BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Amona Bridge : डिचोली, आमोणे पुलावरून एका युवतीने मांडवी नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती समोर आली असून, बेपत्ता युवतीचा शोध जारी आहे. शनिवारी (ता.१८) सायंकाळी उशिरापर्यंत तिचा थांगपत्ता लागला नव्हता.

ज्या युवतीने नदीत उडी घेतल्याचा संशय आहे, त्या युवतीचे नाव अनुपमा गावकर (२४) असे आहे. पुलावर तिची दुचाकी सापडली आहे.

आरोग्य खात्याची कर्मचारी असलेली अनुपमा ही वेळगे-सत्तरी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. अनुपमा या युवतीने शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी आमोणे पुलावरून नदीत उडी मारल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मोटारबोटीच्या मदतीने मांडवी नदीपात्रात शोधमोहीम राबवली. मात्र, संबंधित युवतीचा थांगपत्ता लागला नाही. काळोख पडताच शोधमोहीम थांबविण्यात आली.

Amona Bridge
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये बदल, जाणून घ्या 19 नोव्हेंबरचे नवे दर...

डिचोली अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर व्ही.डी. गावकर, राजन परब आणि साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रुपेश पळ, विशांत वायंगणकर, योगेश माईणकर आदी जवानांनी आमोणेसह पिळगाव, सारमानस आदी भागातील नदीपात्रात शोधमोहिमेत भाग घेतला. रविवारीही पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com