Bank Fraud Case
Bank Fraud CaseDainik Gomantak

Bank Fraud Case: माशेल महिला सहकारी पतसंस्थेत मोठा घोटाळा

संचालक मंडळाविरद्ध आर्थिक गुन्हे कक्ष पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

माशेल महिला सहकारी पतसंस्थेत तब्बल 18 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरद्ध गुंतवणूकदाराना फसविल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्ष पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद झाली आहे. संचालक मंडळात माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांची पत्नी तथा जुने गोव्याच्या माजी सरपंच जनिता मडकईकर यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे.

अटकपूर्व जामिनासाठी सहा संचालकानी अर्ज केलेल्यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी अटक करून सुटका केली आहे. तक्रारीनुसार, पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाने इतरांच्या संगनमताने काही गुंतवणूकदारांना अवैधरित्या कर्ज दिले. नोंदणी प्राधिकरणाकडून योग्य ती तत्परता न घेता आणि कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन करून कर्ज देण्यात आले होते.

Bank Fraud Case
Sunburn Festival : सनबर्न ध्वनी प्रदूषणाचा अहवाल चार आठवड्यात सादर करा - उच्च न्यायालय

त्यामुळे पतसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जाची रक्कम न भरणे, कर्मचाऱ्यांना दिलेले अनधिकृत वेतन आणि अनधिकृत खर्च याशिवाय एप्रिल 2009 पासून 10 वर्षे बँक रेकॉर्डमध्ये खाते न ठेवता पिग्मी ठेव खाते सेठवून गुंतवणूकदारांची सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com