Sasashti News : ९० टक्के खासदार निधीचा केला विनियोग; माजी खासदार सार्दिन

Sasashti News : २२.३३ कोटींची कामे केल्याचा दावा ;त्यामुळे पाच वर्षांत त्यांना २५ कोटींचा निधी वापरता येतो. माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पाच वर्षांत २५ कोटी पैकी २२.३३ कोटी म्हणजे ९० टक्के निधी वापरला, अशी माहिती आहे.
Francis Sardin
Francis Sardin Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी खासदार निधी योजना डिसेंबर १९९३ पासुन केंद्र सरकारने सुरु केली होती. सध्या प्रत्येक खासदाराला प्रत्येक वर्षाकाठी ५ कोटी रुपये दिले जातात.

त्यामुळे पाच वर्षांत त्यांना २५ कोटींचा निधी वापरता येतो. माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पाच वर्षांत २५ कोटी पैकी २२.३३ कोटी म्हणजे ९० टक्के निधी वापरला, अशी माहिती आहे.

माजी खासदार सार्दिन यांनी सांगितले,की आपण जिल्हा पंचायतीच्या सदस्यांना सुद्धा गटारे व नाले झाकण्यासाठी निधी मंजूर केला. या योजनेअंतर्गत ३.४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील २.५६ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. मात्र हा निधी मार्च २०२४ मध्ये मंजूर झाल्याने त्याचा पूर्णपणे वापर करता आला नाही.

त्यांनी पंचवाडी येथील स्मशान भूमीसाठी, कुडतरी, चांदर, कावरे चिखली येथील रेजिना मुंडी हायस्कूलला मैदानांसाठी निधी मंजूर करून ते काम पूर्ण करून घेतले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळासाठी सुद्धा त्यांनी ॲम्ब्युलन्स दिली. कुडतरी मतदारसंघातच त्याने जवळ जवळ २.१४ कोटींची विकास कामे करून घेतली.

याशिवाय त्यांनी अन्य अनेक विकास योजनांना निधी मंजूर करून घेतला होता. त्यातील काही कामे आता दक्षिण गोव्यातील खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनाही सार्दिन यांचा उर्वरित निधी वापरण्याची व अपूर्ण राहिलेल्या योजना पूर्ण करण्याची संधी आहे,असे ते म्हणाले.

Francis Sardin
Flights To Goa: आता दिल्लीला जाण्याची गरज नाही; हिंडनवरून थेट गोव्याला विमानसेवा सुरु होणार

या कामांसाठी वापरला निधी

दक्षिण गोव्यातील काही शाळांना संगणक, प्रयोगशाळेची साधने, स्मार्ट बोर्ड वगैरे ः १०.४१ कोटी रुपये

गावांमधील गटारे झाकण्यासाठी कॉंक्रिट स्लॅब साठी ः ३.४३ कोटी रुपये

स्मशान भूमींच्या सुधारणांसाठी ः २.१९ कोटी रुपये

मैदानांसाठी ः १.५० कोटी रुपये

ॲम्ब्युलन्स व हर्स व्हॅन ः ८५ लाख रुपये

दिव्यांग व विकलांगासाठी ः ८१ लाख रुपये

जिम्नॅजियमसाठी ः ७१ लाख रुपये

सीसीटीव्ही ः ४८ लाख

सार्वजनिक ठिकाणी विद्युतीकरण ः ४४ लाख रुपये

Francis Sardin
Flights To Goa: आता दिल्लीला जाण्याची गरज नाही; हिंडनवरून थेट गोव्याला विमानसेवा सुरु होणार

सावईकरांचाही निधी वापरला :

उर्वरित निधी आपण वापरणार होतो, त्यासाठी काही योजना आखल्या होत्या. पण लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या व तो निधी वापरता आला नाही. आपण आपल्या पूर्वीच्या म्हणजेच भाजपचे नरेंद्र सावईकर यांचे अंदाजे २ कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून होता, तोही वापरला, असे सार्दिन यांनी सांगितले. २४.३३ कोटी निधी समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरला,असा दावा माजी खासदार सार्दिन यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com