Olympiart 2024: रंगीबेरंगी 'ऑलिंपिआर्ट' मध्ये गोमंतकीय चित्रकारांचा डंका! सर्वाधिक संख्येने घेतला सहभाग

Olympiart 2024 At Noida: नोएडा सेक्टर-६२ येथे आयोजित केलेल्या ‘ऑलिंपिआर्ट २०२४’, या जगातील सर्वात मोठ्या कला महोत्सवाला उपस्थित राहण्याची संधी गोव्यातील ९ कलाकारांनी घेतली.
Olympiart 2024
Goan Artist In Olympiart 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goan Artist In Olympiart 2024

पणजी: आंतरराष्ट्रीय वॉटरकलर सोसायटीने, ६ ते ८ डिसेंबर, २०२४ अशा तीन दिवसांच्या कालावधीत नोएडा सेक्टर-६२ येथे आयोजित केलेल्या ‘ऑलिंपिआर्ट २०२४’, या जगातील सर्वात मोठ्या कला महोत्सवाला उपस्थित राहण्याची संधी गोव्यातील ९ कलाकारांनी घेतली. या महोत्सवामध्ये जगभरातील अनेक कलाकार सहभागी झाले होते, ज्यात सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष मिस्टर अतानुर डोगन यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात शिल्पकार राम व्ही. सुतार यांच्या हस्ते झाले, ज्यांनी प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल) शिल्प घडवले आहे. गोव्याकरिता अभिमानाची गोष्ट म्हणजे, या महोत्सवात सर्वाधिक संख्येने गोमंतकीय कलाकार सहभागी झाले होते. ११ गोमंतकीय कलाकारांची चित्रे या प्रदर्शनामध्ये सादर झाली. कालिदास सातार्डेकर, सुमित्रा बखले, प्रसाद नाईक, भरत पंडित, अनिता कुबल, रोहन माळगावकर, स्मृती गोस्वामी, शुभा घसरी, रूपाली हळदणकर, विनय म्हांब्रे आणि पूजा औदी या चित्रकारांचा त्यात समावेश होता.

प्रदर्शनाव्यतिरिक्त सुमारे २० आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी तिथे ‘मास्टर डेमोन्स्ट्रेशन’ दिली. अतानुर डोगन (तुर्की), डेव्हिड टेलर (ऑस्ट्रेलिया), जो डोडेन (इंग्लंड), अँटोनियो बार्टोलो (पोर्तुगाल), फर्नांड थिएन्पोंड्ट (बेल्जियम), इग्ली अराबी (इटली) आणि इतर अनेक नामांकित कलाकारांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक देताना पाहणे म्हणजे इतर चित्रकारांसाठी एका प्रकारचे विशेष शिक्षण होते.

Olympiart 2024
Divjotsav In Goa: तोच सण, तोच उत्साह पण पद्धती होताहेत आधुनिक! दिवजोत्सवात पितळी दिव्यांचा वाढता शिरकाव

या महोत्सवात चित्रकारांसाठी “माझ्या दृष्टीने भारत” या विषयावर आधारित ‘ऑन-द-स्पॉट पेंटिंग स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गोव्याच्या सर्व कलाकारांनी सहभाग घेतला आणि त्यापैकी दोघांनी पुरस्कार जिंकून गोव्याचा मान उंचावला. कालिदास सातार्डेकर यांना पोर्ट्रेट पेंटिंगसाठी द्वितीय पुरस्कार मिळाला तर प्रसाद नाईक यांनी डीएमई कॉलेजच्या लाईव्ह पेंटिंगसाठी तृतीय पुरस्कार मिळवला.

Olympiart 2024
Serendipity Arts Festival: गोमंतकीय नाटकाने उघडणार 'सेरेंडिपीटी'चा पडदा; प्रथमच गोव्यातील दिग्दर्शकाच्या कलाकृतीचा समावेश

दर्शनाव्यतिरिक्त सुमारे 20 आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी तिथे ‘मास्टर डेमोन्स्ट्रेशन’ दिली. अतानुर डोगन (तुर्की), डेव्हिड टेलर (ऑस्ट्रेलिया), जो डोडेन (इंग्लंड), अँटोनियो बार्टोलो (पोर्तुगाल), फर्नांड थिएन्पोंड्ट (बेल्जियम), इग्ली अराबी (इटली) आणि इतर अनेक नामांकित कलाकारांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक देताना पाहणे म्हणजे इतर चित्रकारांसाठी एका प्रकारचे विशेष शिक्षण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com