Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Ponda News : निवडणूक आचारसंहितेमुळे बसला होता फटका
Published on

Ponda News :

फोंडा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसल्याने फोंडा पालिकेच्या एकूण ८४ रोजंदारी कामगारांचा एप्रिल महिन्याचा अडून राहिलेला पगार त्वरित देण्याचा निर्णय पालिकेच्या आज शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी ही तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीला उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर तसेच इतर नगरसेवक पालिका मुख्याधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. या रोजंदारी कामगारांचा कार्यकाळ समाप्त होणार होता, त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार देण्यात कायदेशीर अडथळा निर्माण झाला होता. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने पगार देण्यास परवानगी न दिल्याने या अडचणीत भर पडली होती.

पालिकेच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत नगराध्यक्ष तसेच इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला व पालिकेतर्फे हा पगार देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. पगार मिळणार या आशेने रोजंदारी कामगार कार्यालयात जमले होते.

Ponda
Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

दरम्यान, पालिकेने रोजंदारी कामगारांना पगार घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर उशिरा निवडणूक आयोगाने त्याला मंजुरी दिली, त्यामुळे रोजंदारी कामगारांनी आनंद व्यक्त केला. एकूण ८४ रोजंदारी कामगारांवर पालिका पगारावर ११,७६,०७० रुपये खर्च करते.

सुक्या कचऱ्याच्या नियोजनाची तयारी

फोंडा पालिका क्षेत्रातील सुक्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी पणजीस्थित वन अर्थ या पर्यावरणप्रेमी आस्थापनाने तयारी दर्शवली असून आधी या आस्थापनाचे कार्य पालिका अभियंत्यांनी तपासावे आणि नंतरच होकार द्यावा, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com